साप्ताहिक शुभकार्य -17-7-2024

 भाजपा कार्यकर्त्यानी विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागावे -सुरेशराव हाळवणकर

उत्तम हुजरे - इचलकरंजी 

 जे भाजपमध्ये नाहीत त्यांना पक्षातून विधानसभेची उमेदवार कशी मिळणार ?असा सवाल माजी आमदार सुरेशराव हाळवणकर यांनी आज कार्यकर्त्यांच्या बैठकीत उपस्थित केला 

इचलकरंजी शहर भाजपा कार्यालयात झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते 

    संभाव्य उमेदवारांच्या कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने कामाला लागावे असे आवाहन ही त्यांनी कार्यकर्त्यांना केले 

   पुढे बोलताना म्हणाले विधानसभा निवडणूक कमळ चिन्हावर लढवली जाणार असून त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी तळागाळातील लोकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत इचलकरंजी मध्ये  आमदार व महापालिकेमध्ये महापौर हा भाजपचाच असणार आहे 

विरोधकांच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देऊ नका

    या निवडणुकीत विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केला जाईल कोणीही कितीही दावा केला तरी लोकसभा  निवडणूक  चे यश हे भाजपच्या कार्यकर्त्यांचेच आहे

  यावेळी विजय भोजे , जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, धोंडीराम जावळे ,आदींनी आपले मनोगत व्यक्त केले 

   बैठकीस  बुथ रचनात्मक काम ,पक्षीय संघटनात्मक कामकाज ,नव मतदार नोंदणी अभियान, तसेच नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पातील विविध योजना ,शासनाने घेतले निर्णय अशा अनेक विविध विषयावर चर्चा करण्यात आली 

यावेळी शहराध्यक्ष अमृत मामा भोसले ,मिश्रीलाल जाजू ,राजेश रजपुते ,अश्विनी कुबडगे विनोद कांकाणी, आदी उपस्थित होते

टिप्पण्या