पोस्ट्स

सप्टेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
  साप्ताहिक शुभकार्य=10/9/2024 शहापूर पोलिसांनी मोटरसायकल चोरणाऱ्यांना घेतले ताब्यात      चार मोटरसायकली हस्तगत उत्तम हुजरे -साप्ताहीक शुभकार्य  शहापूर----  येथील पोलिसांनी मोटरसायकली चोरी करणाऱ्या शाहरुख जावेद जमादार वय वर्ष 25 राहणार जवाहर नगर इचलकरंजी हर्षवर्धन श्रीकांत काटे वय वर्ष 18 राहणार आंबेडकर नगर डेक्कन मिल जवळ अजय राजेंद्र सूर्यवंशी व 19 राहणार दत्तनगर भाटले मळा अजय संजय बोटे राहणार गणेशनगर शहापूर अशा चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चार मोटरसायकली असा एकूण एक लाख 43 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे तर पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की 24 ऑगस्ट रोजी हिरो होंडा सीडी डॉन काळ्या रंगाची मोटरसायकल ही राहत्या घरापासून कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरल्याची तक्रार शहापूर पोलिसात आली होती त्यानुसार शहापूर पोलिसांनी गोपनीय रित्या तपास करत माहिती काढत संशयतांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता  मोटरसायकली चोरल्याचे संशयतांनी कबूल दिली तर त्यांच्या कब्जातून एकूण तीन मोटरसायकली व एक गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण...
इमेज
  साप्ताहिक शुभकार्य=9/9/2024 सरपंच संतोष भोरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा  वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेत एलईडी पाईपचे वाटप उत्तम हुजरे-साप्ताहीक शुभकार्य  कोरोची गावचे लोकनियुक्त सरपंच संतोष भोरे यांनी वाढदिवसाला होणार्या खर्चा ला फाटा देत  जिल्हा परिषद शाळेत साधेपणाने वाढदिवस साजरा केला    या वाढदिवसाच्या निमित्ताने कोरोची येथील कुमार  व कन्या विद्या मंदिर व भाग शाळा येथील प्रत्येक वर्गासाठी एलईडी लाईट  चे वाटप करत सामाजिक बांधिलकी जपली यावेळी  सरपंच भोरे म्हणाले वाढदिवसाला होणारा अनावश्यक खर्च टाळन प्रत्येकाने शाळेला थोडीफार मदत करावी ज्या शाळेने आपल्याला मोठे केले. आपल्याला शिक्षणाचे धडे दिले त्या शाळेला पुन्हा फुलाची पाकळी म्हणून मदत करून तेथील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण व त्यांची पूर्ण व्यवस्था व्हावी यासाठी शाळेचा विद्यार्थी म्हणून काही कर्तव्य पूर्ण करणे गरजेचे आहे म्हणूनच उपक्रम वाढदिवस हाती घेतला आहे असे उद्गार यावी सरपंच संतोष भोरे यांनी काढले तर या वेळी ग्रामपंचायत सदस्य साहेब लाल शेख राजकुमार चावरे, विकी माने, संजय कांबळ...
इमेज
  साप्ताहिक शुभकार्य=6/9/2024 कोरोची घनकचरा उठाव मोहिमेस प्रारंभ   राहुल आवाडे यांच्या  प्रयत्नांना यश उत्तम हुजरे -साप्ताहीक शुभकार्य   कोरोची -कोरोची येथील अनेक वर्ष प्रलंबित असलेला घनकचऱ्याचा प्रश्न मार्गी लागला असून त्या घनकचऱ्याचा उठाव आजपासून करण्यात आला     याबाबत अधिक माहिती अशी की कोरोची गावचा घनकचऱ्याचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित होता डॉ. राहुल आवाडे यांनी या प्रश्नाला जाणीवपूर्वक लक्ष घालून कोरोची गाव घनकचरा मुक्त करण्याची ठरवले त्यानुसार ग्रामपंचायतीच्या वतीने एकूण सहा वॉर्डातील कचरा एका ठिकाणी साठवत तो जमा झालेला कचरा आपल्या जबाबदारी वरती आठवड्यातून तीन वेळा उठवत कोरोची गाव घनकचरा मुक्त करण्याची जबाबदारी उचलली त्यानुसार आज पासून जमा झालेला कचरा उठावास प्रारंभ झाला असून नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे तसेच कोरोची गाव घनकचरा मुक्त गाव म्हणून लवकरच नावारूपास येईल अशी चर्चा नागरिकांतून सुरू होती. या कचरा उठावा वेळी सरपंच संतोष भोरे ग्रामसेवक अनंत गडदे, ग्रामपंचायत सदस्य साहेबलाल शेख, संजय कांबळे ,शीतल पाटील, विकी माने, बंडा पाटील यांच्या...