साप्ताहिक शुभकार्य=9/9/2024
सरपंच संतोष भोरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेत एलईडी पाईपचे वाटप
उत्तम हुजरे-साप्ताहीक शुभकार्य
कोरोची गावचे लोकनियुक्त सरपंच संतोष भोरे यांनी वाढदिवसाला होणार्या खर्चा ला फाटा देत जिल्हा परिषद शाळेत साधेपणाने वाढदिवस साजरा केला
या वाढदिवसाच्या निमित्ताने कोरोची येथील कुमार व कन्या विद्या मंदिर व भाग शाळा येथील प्रत्येक वर्गासाठी एलईडी लाईट चे वाटप करत सामाजिक बांधिलकी जपली यावेळी
सरपंच भोरे म्हणाले वाढदिवसाला होणारा अनावश्यक खर्च टाळन प्रत्येकाने शाळेला थोडीफार मदत करावी ज्या शाळेने आपल्याला मोठे केले. आपल्याला शिक्षणाचे धडे दिले त्या शाळेला पुन्हा फुलाची पाकळी म्हणून मदत करून तेथील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण व त्यांची पूर्ण व्यवस्था व्हावी यासाठी शाळेचा विद्यार्थी म्हणून काही कर्तव्य पूर्ण करणे गरजेचे आहे म्हणूनच उपक्रम वाढदिवस हाती घेतला आहे असे उद्गार यावी सरपंच संतोष भोरे यांनी काढले तर या वेळी ग्रामपंचायत सदस्य साहेब लाल शेख राजकुमार चावरे, विकी माने, संजय कांबळे, आनंद लोहार, राजू चव्हाण, शितल माने,मलगुंड पाटील, पोलीस पाटील सावकार हेगडे ,नबी रसूल बागवान, यासह ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा