पोस्ट्स

जुलै, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
 साप्ताहिक शुभकार्य -1-8-2024 राजस्थान युवक मंडल इचलकरंजी यांच्या वतीने रामलिंग कावड यात्रा संपन्न   इचलकरंजी येथील राजस्थानी युवक मंडल च्या  वतीने दरवर्षी रामलिंग कावड यात्रा संपन्न होते गेली 35 वर्षे राजस्थानी युवक मंडळ चे सर्व भक्त भाविक क्षेत्र रामलिंग या ठिकाणी पायी प्रवास करत श्रींचे दर्शन घेतात    याही वर्षी अत्यंत भक्ती भावाने इचलकरंजी कापड मार्केट ते क्षेत्र रामलिंग या ठिकाणी पायी कावड यात्रा चालत जाऊन राजस्थानी युवक मंडल   सर्व भक्त भाविक यांनी रामलिंग श्री चे दर्शन अत्यंत भक्ती भावांनी घेतले  या कावड यात्रे मध्ये इचलकरंजी पासून ते रामलिंग पर्यंत अनेक ठिकाणी भक्त भाविकांना पारिक युवा मंचच्या वतीने पाण्याची व फल आहार ची व्यवस्था करण्यात आली होती
इमेज
 साप्ताहिक शुभकार्य -31-7-2024 कोरोचीत सर्पमित्र चेतन चावरे याची आत्महत्या कोरोची वार्ताहर: कोरोची चावरे मळा येथील धाडसी सर्पमित्र चेतन बाबासो चावरे (वय वर्ष 32) याने घरामध्ये तुळीला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.   चेतन चावरे यांनी नाग-घोणस- धामीन- फरुड जातीच्या अनेक सापांना जीवदान दिले आहे.  गावामध्ये कोणाच्या  ही घरी  साप आल्यास तो साप पकडून तो साप कोणत्या जातीचा आहे  याची माहिती देऊन  त्या सापाला जीवदान देण्याचे कार्य करीत  होते. मंगळवारी दुपारी 1   वाजण्याच्या सुमारास घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. हातकलंगले ग्रामीण रुग्णालय येथे शव विच्छेदन करून प्रेत अंत्यविधीसाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. आत्महत्याचे कारण नेमके समजू शकले नाही याची नोंद शहापूर पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे.त्याच्या  पश्चात आई-वडील असा परिवार आहे त्याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे 
इमेज
 साप्ताहिक शुभकार्य -29-7-2024 इचलकरंजी मध्ये अपघातात एकाचा मृत्यू व एकजण जखमी इचलकरंजी येथील होळकर चौक ते खंजिरे पेट्रोल पंप कडे जाणारा रोडवर असलेले योगेश्री सायकल दुकान च्या समोर रविवार दिनांक 28 जुलै रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास झालेल्या अपघातात राजू वसंत आईवळे वय वर्ष 45 राहणार शिरढोन तालुका शिरोळ यांचा मृत्यू झाला तर तोसिफ हनिफ सय्यद वय वर्ष 29 राहणार कृष्णनगर शहापूर हे जखमी झाले आहेत तर पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की राजू वसंत आयवळे व तोसीफ सय्यद हे सेन्ट्रीन काम करतात तर हे दोघे एम एच झिरो नाईन बीडी 23 97 वरून हेरले येथे कामासाठी जात असताना होळकर चौक ते खंजिरे पेट्रोल पंप जवळ जाणार रोडवर असलेल्या योगेश्री सायकल दुकान च्या समोरुन येणाऱ्या छोटा हत्ती टेम्पो नंबर एम एच 45 73 61 वरील चालकाने त्यांच्या टेम्पोमध्ये मोठा बीम भरून घेऊन जात होता तो बीम टेम्पोच्या बाहेर जादा प्रमाणात आल्या असल्याने व तो टेम्पो भरदाव वेगाने चालवून अचानक पणे बाजूला टेम्पो घेतल्याने सदर टेम्पो मधील बीमाची बाहेरील आलेली बाजू तोसिफ व त्यांचा कामगार राजू आईवळे यांना जोरात लागल्याने यामध्ये तोसिप ...
इमेज
  साप्ताहिक शुभकार्य 27-7-2024 दत्त साखर कारखाना चेअरमन पदी रघुनाथ पाटील तर व्हाईस चेअरमन पदी शरदचंद्र पाठक यांची  निवड     शिरोळ- येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी रघुनाथ देवगोंडा पाटील यांची तर व्हाईस चेअरमन पदी शरदचंद्र विश्वनाथ पाठक यांची एक मताने निवड करण्यात आली   श्रीदत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच संपन्न झाली कारखान्याचे चेअरमन सहकार महर्षी गणपतराव पाटील यांचे नेतृत्वाखाली श्री दत्त शेतकरी विकास पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले   श्री दत्त साखर कारखान्यात चेअरमन व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात कारखान्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षखाली नूतन संचालक मंडळाची विशेष सभा पार पडली यावेळी कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी चेअरमन पदासाठी रघुनाथ पाटील यांचे नाव सुचवले त्याच ज्येष्ठ संचालक अनिल कुमार यादव यांनी अनुमोदन दिले चेअरमन पदासाठी रघुनाथ पाटील यांची एकमेव नाव पुढे आल्याने त्यांची एकमत...
इमेज
साप्ताहिक शुभकार्य -26-7-2024 वृद्धाश्रमात फळे वाटप करताना जी पी पारसिक बँकेचे अधिकारी जी पी पारसिक बँकेच्या वतीने गुरुपौर्णिमा निमित्त वृद्धाश्रमात फळे वाटप कोरोची (वार्ताहर)- इचलकरंजी येथील जी पी पारसिक बँकेच्या वतीने गुरुपौर्णिमा निमित्त चोकाक फाटा इचलकरंजी कोल्हापूर येथील शांती कुंज वृद्धाश्रमात वृद्धांना फळे वाटप करून जी पी पारसिक सहकारी बँकेने सामाजिक बांधिलकी जपली अशी सामाजिक बांधिलकी जपणारी एकमेव बँक असून या बँकेचा आदर्श इतर बँकेने घ्यावा असे मत वृद्धाश्रमाचे मॅनेजर विजयकुमार सातपुते यांनी बोलताना व्यक्त केले   बँकेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय गोपीनाथ दादा शिवराम पाटील यांच्या प्रेरणेतून व श्री दीनानाथ पांडुरंग म्हात्रे यांच्या पुढाकारातून हा सदरचा उपक्रम राबवण्यात आला    यावेळी इचलकरंजी शाखेचे अधिकारी श्री अनवेश बांदे ऑफिसर विलास यादव कर्मचारी महेश उगलमुगले तसेच वृद्धाश्रमाचे मॅनेजर विजयकुमार सातपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते
इमेज
 साप्ताहिक शुभकार्य -23-7-2024 रत्नदीप हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज स्मृती सन्मान सोहळा निमित्त मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या अध्यक्षा सौ रजनीताई मगदूम  रत्नदीप हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने स्मृती सन्मान व पाद्यपूजन सोहळा संपन्न     कोरोची -कबनूर येथील रत्नदीप हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, गंगानगर च्या वतीने गुरुपौर्णिमा निमित्त सेवानिवृत्त शिक्षकांचा स्मृती सन्मान व पाद्यपूजन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी 50 सेवानिवृत्त शिक्षकांची उपस्थिती होती हे विशेष...     यावेळी शिक्षण संस्था स्थापन झाल्यापासून आज तागायत शिक्षण संस्थेमधून सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक ,शिक्षक -शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांचा गुरुपौर्णिमा निमित्त स्मृती सन्मान सोहळा व पाद्यपूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला.     प्रारंभी मान्यवर व सर्व सेवानिवृत्त शिक्षकांच्या हस्ते दे.भ.रत्नाप्पाण्णा कुंभार व रत्नपन्नांचे राजकीय मार्गदर्शक कै. दादासाहेब मगदूम(मास्तर) यांच्या  प्रतिमेचे पूजन करण्यात आले.    त्यानंतर या सर्व सेवानिवृत्त शिक्षकांचा शाल ...
इमेज
साप्ताहिक शुभकार्य -22-7-2024 जी.पी. पारसिक बँकेच्या वतीने गुरुपौर्णिमा निमित्त वृक्षारोपण संपन्न कोरोची : येथील  जी.पी. पारसिक सहकारी बँक यांच्यावतीने गुरुपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून जी. पी. पारसिक सहकारी बँक  लि.यांच्या क्लस्टर 4 च्या वतीने कर्मचारी वर्गाने गुरुवर्य बँकेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय गोपीनाथदादा शिवराम पाटील यांना गुरुवंदना म्हणून क्लस्टर हेड  दीनानाथ पांडुरंग म्हात्रे  यांच्या पुढाकाराने कोरोची -शाहू पुतळा- इचलकरंजी येथे बँकेच्या परिसरात  45 कर्मचाऱ्यांच्या वतीने प्रत्येकी एक फुलाचे झाड लावून आपल्या लोकप्रिय गुरूंना आपली गुरु भेट दिली.या निमित्ताने संपूर्ण इचलकरंजी परिसरामध्ये जी. पी. पारसिक बँकेचे व सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे यावेळी एडवोकेट चिरमुंगे,मे स्वरा डिजिटल चे अमर शिवते,शाखाधिकारी अन्वेष बांदे,श्रीकांत पाटील, अरुण पाटील, विकास भोसले,बाहुबली पाटील, उज्वला मधाळे,रोशन पाटील, चिराग मोकाशी, अमित घाडगे ,संतोष हेरुगिरी, प्रकाश गावडे ,शिवाजी मोरे, रामचंद्र कोरवी, यांच्यासहबँक स्टाफ व कर्मचारी उपस्थ...
इमेज
 साप्ताहिक शुभकार्य -22-7-2024 कोरोचीत आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमेनिमित्त दिंडी संपन्न कोरोची वार्ताहर: कोरोची येथील जय हिंद भजनी मंडळ यांच्या वतीने आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमेनिमित्त पालखी व दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पालखी पूजन सौ सुनंदा शिंदे व बाळाबाई मोरबाळे यांच्या हस्ते करण्यात आले.विना पूजन संयोजिका स्मिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आणि  जय हिंद मंडळापासून पालखी सोहळ्याला सुरुवात करण्यात आली व देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना येथील गणेश मंदिरात येऊन रिंगण सोहळा संपन्न झाला आणि महाआरती करून गावातून नगरप्रदक्षिणा काढण्यात आली व दिंडी सोहळ्याची सांगता करण्यात आली.. सदर दिंडी सोहळा संपन्न होण्यासाठी लक्ष्मी सुतार ,शोभा पाटील ,शालन पाटील ,रेखा घाटगे सुवर्ता घाटगे, आशा धायगुडे ,हिंदू सातपुते भारती खामकर, अनिता म्हस्के ,सारिका माळी स्नेहलता देसाई, पूजा पाटील, उषा कुलाल अनिता कुंभार ,प्रतीक्षा कुंभार ,ताराबाई रावळ मनस्वी पाटील ,अर्जुन चव्हाण ,दीपक कावणे धनराज घाडगे, यांच्यासह  महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इमेज
 साप्ताहिक शुभकार्य -22-7-2024 अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ आध्यत्मिक विकास व सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित) शाखा कोरोची यांच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी     कोरोची - येथील स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास सेवा केंद्र कोरोची  यांच्या वतीने गुरुपौर्णिमा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले सकाळ पासून भाविकांनी दर्शना साठी गर्दी केली होती. सकाळी भूपाळी आरतीनंतर श्री स्वामी समर्थ महारांज्यांच्या मूर्ती वर अभिषेक घालून सर्व सेवेकरी व भाविकांना गुरुपद देण्याचा कार्यक्रम सुरु झाला. त्यानंतर साडेदहा वाजता नैवेद्य आरती माजी नगरसेवक श्री. मनोज हिंगमिरे हस्ते संप्पन्न झाली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत साडेचारशे च्या वर भाविकांनी श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरु करून घेतले. मोठया भक्तीभावात गुरुपौर्णिमेचा सोहळा संप्पन्न झाला. सोहळ्यासाठी कोरोची गावातील व परिसरातील भाविक व सेवेकरी उपस्थित होते.
इमेज
साप्ताहिक शुभकार्य -17-7-2024 जयसिंगपुर येथील प्रसिद्ध रांगोळी कलाकार प्राजक्ता साळोखे  यांनी रांगोळीतून रेखाटलेले विठूराया  कोल्हापुरात रांगोळीतून रेखाटले विठुराया   उत्तम हुजरे- जयसिंगपूर येथील प्रसिद्ध रांगोळी कलाकार प्राजक्ता गणेश साळोखे यांनी आषाढी एकादशी निमित्त महालक्ष्मी मंदिर परिसरात विठू माझा लेकुरवाळा ही हुबेहूब रांगोळी काढून सर्वांची मने जिंकली ही रांगोळी सहा बाय चार फूट या आकारामध्ये काढत तब्बल 11 तासांचा अवधी लागला त्यांना सर्वांनी शुभेच्छा देत त्यांच्या कलेचे कौतुक केले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या    प्राजक्ता या मूळ कोल्हापुरच्या असून सध्या जयसिंगपूर या ठिकाणी स्थायिक आहेत
इमेज
 साप्ताहिक शुभकार्य -14-7-2024 तेजस फाउंडेशन चा पुरस्कार सोहळा  माणकाकापूर येथील पत्रकार शिवाजी येडवाण समाजभूषण पुरस्काराने सन्मानित                             उत्तम हुजरे- इचलकरंजी तेजस फाऊंडेशन नाशिक आयोजित, कालकथित तेजस मेघा डोळस यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा डॉ. मौलाना आझाद संशोधन केंद्र, टि.व्ही सेंटर हडको, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी इचलकरंजी येथील जेष्ठ धन्वंतरी- डॉ. अर्जून घट्टे व अभिनेता- लालचंद पारिक, जादुगार- रमेश बरडे (यड्राव), पत्रकार- शिवाजी येडवान (माणकापूर), कवी- साताप्पा सुतार (यळगुड), विजयकुमार साबळे (तुरुंबे), प्रवचनकार- विलास पाटील (हुपरी), सिध्दाप्पा गावडे (कारदगा), सौ. वैशाली कांबळे (फलटण), बाॅलीवुड अभिनेते- विजय मानवतकर (छ. संभाजी नगर- औरंगाबाद) व अभिनेते- शैलेंद्र होळकर (मध्यप्रदेश) यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सदर सन्मानदिन्ह व सन्मानपत्र देऊन राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आ...
इमेज
 साप्ताहिक शुभकार्य -17-7-2024   भाजपा कार्यकर्त्यानी विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागावे -सुरेशराव हाळवणकर उत्तम हुजरे - इचलकरंजी   जे भाजपमध्ये नाहीत त्यांना पक्षातून विधानसभेची उमेदवार कशी मिळणार ?असा सवाल माजी आमदार सुरेशराव हाळवणकर यांनी आज कार्यकर्त्यांच्या बैठकीत उपस्थित केला  इचलकरंजी शहर भाजपा कार्यालयात झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते      संभाव्य उमेदवारांच्या कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने कामाला लागावे असे आवाहन ही त्यांनी कार्यकर्त्यांना केले     पुढे बोलताना म्हणाले विधानसभा निवडणूक कमळ चिन्हावर लढवली जाणार असून त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी तळागाळातील लोकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत इचलकरंजी मध्ये  आमदार व महापालिकेमध्ये महापौर हा भाजपचाच असणार आहे  विरोधकांच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देऊ नका     या निवडणुकीत विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केला जाईल कोणीही कितीही दावा केला तरी लोकसभा  निवडणूक  चे यश हे भाजपच्य...
इमेज
 साप्ताहिक शुभकार्य -12-7-2024 सामाजिक कार्यकर्ते महेश कांबळे यांचा वाढदिवस साजरा करताना उपस्थित मान्यवर व विद्यार्थी  कबनूर येथील सामाजिक कार्यकर्ते महेश कांबळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा कबनूर -येथील सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करत असलेले कोणत्याही प्रकारची कोणाकडूनही अपेक्षा न बाळगणारे महेश कांबळे यांचा वाढदिवस कुमार , कन्या विद्या मंदिर व उर्दू शाळा व अंगणवाडी कबनूर येथे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करून साजरा करण्यात आला ,वाढदिवसाच्या अनावश्यक खर्च टाळून महेश कांबळे यांनी समाज उपयोगी उपक्रम राबवत वाढदिवस साजरा केला ,महेश कांबळे हे राजकारण न करता नेहमीच समाजकारणामध्ये सक्रिय असल्याचे दिसून येते सामाजिक उपक्रमामध्ये ते नेहमीच अग्रेसर असतात, महेश कांबळे यांचा मंडप लाईट डेकोरेशनचे काम आहे तर ते गोरगरिबांना लग्नसराईत असू दे किंवा कार्यक्रम ते पण पैसे न घेता मदत म्हणून मंडप घालून देतात, त्यांची कायमच सामाजिक भान ठेवून आपण समाजाला काहीतरी देणे लागतो हे मनोभावना मनात ठेवून खऱ्या अर्थाने महेश कांबळे यांचे कार्य चालू आहे ,आज वाढदिवसानिमित्त कबनूर ...