साप्ताहिक शुभकार्य -22-7-2024
कोरोचीत आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमेनिमित्त दिंडी संपन्न

कोरोची वार्ताहर: कोरोची येथील जय हिंद भजनी मंडळ यांच्या वतीने आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमेनिमित्त पालखी व दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

पालखी पूजन सौ सुनंदा शिंदे व बाळाबाई मोरबाळे यांच्या हस्ते करण्यात आले.विना पूजन संयोजिका स्मिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आणि  जय हिंद मंडळापासून पालखी सोहळ्याला सुरुवात करण्यात आली व देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना येथील गणेश मंदिरात येऊन रिंगण सोहळा संपन्न झाला आणि महाआरती करून गावातून नगरप्रदक्षिणा काढण्यात आली व दिंडी सोहळ्याची सांगता करण्यात आली..

सदर दिंडी सोहळा संपन्न होण्यासाठी लक्ष्मी सुतार ,शोभा पाटील ,शालन पाटील ,रेखा घाटगे सुवर्ता घाटगे, आशा धायगुडे ,हिंदू सातपुते भारती खामकर, अनिता म्हस्के ,सारिका माळी स्नेहलता देसाई, पूजा पाटील, उषा कुलाल अनिता कुंभार ,प्रतीक्षा कुंभार ,ताराबाई रावळ मनस्वी पाटील ,अर्जुन चव्हाण ,दीपक कावणे धनराज घाडगे, यांच्यासह  महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट