पोस्ट्स

ऑगस्ट, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
  साप्ताहिक शुभकार्य=31/8/2024 30 व्या वार्षिक सभेत बोलताना संस्थापक चेअरमन शरदचंद्र पाठक  श्री महालक्ष्मी क्रेडिट सौहार्द सहकारी संघ लि कुन्नूर 30 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात  सभासदांनी विश्वासहर्ता जपली-- शरदचंद्र पाठक कुन्नूर-उत्तम हुजरे-साप्ताहीक शुभकार्य   श्री महालक्ष्मी क्रेडिट सौहार्द सहकारी संघा ने सभासदांचा विश्वास संपादन करत  सभासदांच्या पाठीशी संस्था ठामपणे उभे राहिले आहे असे प्रतिपादन संस्थापक चेअरमन श्री शरदचंद्र पाठक यांनी 30 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष स्थानावरून बोलत होते     प्रारंभी चेअरमन व सर्व संचालक यांच्या हस्ते हस्ते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करून वार्षिक सभेची सुरुवात करण्यात आली      यावेळी संस्थापक चेअरमन श्री शरदचंद्र पाठक  म्हणाले संस्थेने गोरगरिबांच्या पाठीशी ठामपणे राहत अनेकांच्या गरजा पूर्ण करत संस्थेने वाटचाल सुरू ठेवली आहे संस्थेचे वाटचाल  पाहता महाराष्ट्र राज्यातील क्रांती रत्न सोशल फाउंडेशनने या संस्थेला उत्कृष्ट पतसंस्था संस्था म्हणून पुरस्काराने सन्मानित केले ...
इमेज
  साप्ताहिक शुभकार्य=30/8/2024 मलिकवाड सरस्वती को ऑप क्रेडिट व वीर राणी चन्नम्मा महिला दूध  संस्थेचे वार्षिक सभा उत्साहात संपन्न   सभासदांनी विश्वासहर्ता जपली-- सौ शोभा पाटील मलिकवाड--- उत्तम हुजरे -साप्ताहीक शुभकार्य   येथील सरस्वती को ऑफ क्रेडिट सोसायटी ने सभासदांचा विश्वास संपादन करत तसेच वीर राणी चन्नम्मा दूध उत्पादक सहकारी संघाने दूध उत्पादकांचा विश्वास संपादन करत विश्वासहर्ता जपले असून सभासदांच्या पाठीशी संस्था ठामपणे उभे राहिले आहे असे प्रतिपादन मलिकवाड सरस्वती सोसायटीचे संस्थेचे चेअरपर्सन सौ शोभा पाटील यांनी संस्थेच्या 26 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व वीर राणी चन्नम्मा दूध उत्पादक संस्थेच्या 25 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष स्थानावरून बोलत होते     प्रारंभी विविध मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले ग्रामपंचायत उपाध्यक्ष संभाजी पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून वार्षिक सभेची सुरुवात करण्यात आली      यावेळी संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पाटील बोलताना म्हणाले संस्थेने गोरगरिबांच्या पाठीशी ठामपणे राहत अनेकांच्या...
इमेज
  साप्ताहिक शुभकार्य=30/8/2024 जोतिराम निकम यांची शिवसेना शिंदे गटाच्या हातकणंगले विभाग प्रमुख पदी निवड उत्तम हुजरे -साप्ताहीक शुभकार्य      इचलकरंजी येथील सामाजिक कार्यकर्ते जोतिराम राजाराम निकम यांची शिवसेना शिंदे गटाच्या अनुसूचित जाती विभागाच्या हातकलंगले तालुका विभाग प्रमुख पदी निवड करण्यात आली असून सदर निवडीचे पत्र राजू वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली तसेच कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष मनोहर बाबुराव खोत यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी खासदार धैर्यशील माने यांची भेट घेतली असता वंदनीय बाळासाहेब ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचावेत तसेच गोरगरिबांच्या पाठीशी राहत शासनाच्या योजना सर्वांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहावे यासाठी पुढील कार्यासाठी खासदार धैर्यशील माने यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी ऋतुजा निकम, सना सय्यद, हर्षद गथंडे, श्रेयस गंथडे ,सोमनाथ निकम, राजवीर कडूकर भुवनेश्वर लोहार यांच्यासह अनेकजण उपस्थित होते
इमेज
  साप्ताहिक शुभकार्य=30/8/2024 कोरोचीत संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी उत्तम हुजरे -साप्ताहीक शुभकार्य     कोरोची येथील संत सेना नाभिक समाज मंडळ कोरोची यांच्या वतीने संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला हा सोहळा कोरोची येथील विठ्ठल मंदिरात पार पडला दुपारी बारा वाजता आरती होऊन फुले वाहण्याचा कार्यक्रम पार पडला      प्रारंभी प्रतिमेचे पूजन अध्यक्ष तानाजी मर्दाने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या सोहळ्याला बालाजी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मदन कारंडे तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी उपस्थितीत राहून संतसेना महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन केले या सर्वांच्या हस्ते महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी अध्यक्ष तानाजी मर्दाने ,उपाध्यक्ष निलेश साळुंखे, सेक्रेटरी महेश चौधरी ,खजिनदार योगेश जाधव, यांच्यासह ग्राम पंचायत सदस्य शीतल पाटील ,साहेब लाल शेख, संजय कांबळे, विकी माने ,आनंदा शेट्टी, डी बी पीष्टे, रणजित शिंदे, बंडा पाटील, प्रकाश पवळे, नरसु पाटील,अभिनंदन पाटील, यांच्यासह कोरोची नगरीतील सर्व नाभिक समाज  बांधव महिला मोठ्या संख्येने...
इमेज
 साप्ताहिक शुभकार्य=29/8/2024 कोरोची गाव घनकचरामुक्त होणार    मा.जि .प .सदस्य राहुल आवाडे  उत्तम हुजरे -साप्ताहीक शुभकार्य   कोरोची- कोरोची ग्रामपंचायत कोरोची यांच्या वतीने कोरोची गावातील राहुल आवाडे यांच्या पुढाकाराने तसेच आमदार प्रकाश आवाडे यांच्या फंडातून कोरोची गावात अनेक विकास कामे पूर्ण  झाल्याबद्दल  कोरोची ग्रामपंचायतच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांचा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला या सत्कार सोहळा प्रसंगी जिल्हा परिषदेचे राहुल आवारडे यांनी कोरोची गाव घनकचरा मुक्त करण्याचे आश्वासन दिले      याबाबत अधिक माहिती अशी की कोरोची गावात गेली दहा वर्ष घनकचरा गावभर पसरला असून यामुळे कोरोचीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे कचऱ्या बाबत अनेक वेळा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घनकचरा मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले पण काही ग्रामस्थांच्या आडमुट्या धोरणामुळे  घनकचरा प्रश्न प्रलंबित पडला आहे     याविषयी कोरोची सरपंच डॉ. संतोष भोरे यांनी विशेष ग्रामपंचायत कार्यालय येथे सर्व सदस्यांची विशेष मीट...
इमेज
  साप्ताहिक शुभकार्य=29/8/2024 कोरोची ग्रामस्थांच्या वतीने सरकारचा निषेध व्यक्त करताना ग्रामस्थ  छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेचा कोरोचीत निषेध उत्तम हुजरे -साप्ताहीक शुभकार्य     कोरोची-  नैवदला निमित्त राजकोट येथे अवघ्या आठ महिन्यापूर्वी उभारलेल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णकृती पुतळा वादळी वाऱ्यामुळे व मुसळधार पावसामुळे कोसळला यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या     सदरचा पुतळ्याचे काम निकृष्ट झाल्याने संबंधित मूर्तिकार यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी  कोरोची ग्रामस्थांच्या वतीने आज कोरोची  बस स्टॅन्ड या ठिकाणी सर्व नागरिक एकत्र जमून सरकारच्या विरोधात तसेच निकृष्ट काम करणाऱ्यावर कठोर करावी व्हावी यासाठी निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी आनंदा शेट्टी, देवानंद कांबळे, नरसू पाटील, शांतिनाथ पाटील, सुहास पाटील, महेश कडाले, रामदास टिकले, आनंद सूर्यवंशी, आयुब सनदी ,अनिकेत देसाई, ग्रामपंचायत सदस्य विकी माने साहेबलाल शेख, असलम सनदी, सर्जेराव माने, अजित कडाले, अक्षय शेट्टी, बंडा पाटील, रणजीत ...
इमेज
  साप्ताहिक शुभकार्य=26/8/2024 मुख्याध्यापक भोकरे यांना मारहाण करताना नागरिक  यशवंत भोकरे मुख्याध्यापक यांना  नागरिकांनी दिला चोप उत्तम हुजरे -साप्ताहीक शुभकार्य      कोरोची येथील  गावभाग कन्या विद्यामंदिर येथील मुख्याध्यापक यशवंत भोकरे यांना नागरिकांनी चांगला चोप देत कार्यालयातून बाहेर काढले      याबाबत अधिक माहिती अशी की दोन दिवसांपूर्वी मुख्याध्यापक भोकरे यांच्या विरोधात शाळेतील मदतनीस यांनी ग्रामपंचायत सदस्य साहेबलाल शेख यांच्याकडे तक्रार दिली होती त्याची दखल घेत ग्रामपंचायत सदस्य साहेब लाल शेख यांनी मुख्याध्यापक भोकरे यांना चांगलेच धारेवर धरले होते याची तक्रार गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे देण्यासाठी आज कन्या विद्यामंदिर या ठिकाणी ग्रामपंचायत मधील सरपंच व सर्व सदस्य हजर असता मुख्याध्यापक भोकरे यांना सरपंच व सर्व सदस्यांनी केलेल्या वर्तुनुकी बद्दल चांगले धारेवर धरले   तेथे हा सर्व प्रकार घडत असताना त्या ठिकाणी आलेल्या नागरिकांनी मुख्याध्यापक भोकरे यांना केलेल्या वर्तणुकीबद्दल त्यांच्या अंगावर जाऊन चांगलाच चोप दिला  व त्यांना...
इमेज
  साप्ताहिक शुभकार्य=24/8/2024 मुख्याध्यापक भोकरे यांना जाब विचारताना ग्रामपंचायत सदस्य साहेब लाल शेख कोरोची येथील जि.प शाळेमधील मुख्याध्यापक भोकरे यांचे गैर वर्तणूक     शाळेमध्ये असणाऱ्या मदतनीस यांना नाहक त्रास कोरोची--- येथील जि प शाळा  कन्या विद्यामंदिर मधील मुख्याध्यापक श्री यशवंत भोकरे सर यांनी शाळेमध्ये असलेल्या मदतनीस यांना परिस्थितीचा गैरफायदा घेत वारंवार नाहक त्रास देत गैर वर्तणूक केल्याची  संदर्भात तक्रार ग्रामपंचायत सदस्य साहेब लाल शेख यांनी आज दिली      याबाबत अधिक माहिती अशी की कोरोची जी प शाळेमध्ये मुख्याध्यापक यशवंत भोकरे यांची काही महिन्यापूर्वी मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती झाली आहे ते पदभार स्वीकारल्यापासून शाळेमध्ये असणाऱ्या मदतनीस यांना परिस्थितीचा गैरफायदा घेत वारंवार कामाच्या बाबतीत नाहक त्रास होत असल्याची तक्रार मदतनीस यांनी ग्रामपंचायत सदस्य साहेबलाल  शेख  व ग्रामपंचायत सदस्य संगीता शेट्टी यांना वारंवार दिली होती  याची दखल घेत आज ग्रामपंचायत सदस्य साहेब लाल शेख यांनी मुख्याध्यापक भोकरे यांना जाब विचारत चांगले...
इमेज
साप्ताहिक शुभकार्य=24/8/2824 शिक्षक पालक सहविचार सभेवेळी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक एस पी. दीक्षित सर रत्नदीप हायस्कूल मध्ये शिक्षक- पालक सहविचार सभा संपन्न उत्तम हुजरे ----साप्ताहीक शुभकार्य  कबनूर -येथील रत्नदीप हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षक-पालक सहविचार सभा संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक एस.पी.दीक्षित होते.               बोर्ड परीक्षेचे नियोजन, विद्यार्थ्यांचे आरोग्य व शालेय योजना या विषयावर चर्चासत्र घडून यावे म्हणून या सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.             कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री आनंद यादव सर यांनी केले तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती, आरोग्य व अभ्यास नियोजन या विषयी आपले विचार मांडले. श्री   डी. के.चौगुले सर यांनी  दहावी नंतरचे करिअर या विषयावर मार्गदर्शन केले.  पी.सी.कोरे मॅडम यांनी शालेय परीक्षा व  वार्षिक नियोजन याची पालकांना माहिती दिली .   यावेळी पालक सुहास परीट यांनी आपल्या मनोगत...
इमेज
  साप्ताहिक शुभकार्य=24/8/2824 रांगोळीतून अवतरले महाकाल शंकर अघोरी      रांगोळी कलाकार भाग्यश्री कोपार्डे यांचे सर्व स्तरातून कौतुक उत्तम हुजरे -साप्ताहीक शुभकार्य    इचलकरंजी येथील श्री आर्ट क्लासेसचे संस्थापक भाग्यश्री कोपार्डे यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून आठ बाय पाच फुटाची महाकाल शंकर अघोरी रूपातील रांगोळी काढत सर्वांची मने जिंकले ही रांगोळी काढण्यासाठी त्यांना एकूण 19 तासांचा अवधी लागला     भाग्यश्री कोपार्डे या सध्या केटकाळे नगर इचलकरंजी येथे राहत असून ते श्री आर्ट या नावाने क्लासेस चालवतात त्यांचा काही दिवसापूर्वी अपघात झाल्याने दोन्ही पायाने ते अधू असून सुद्धा त्या सध्या चाळीस विद्यार्थ्यांना रांगोळी मेहंदी, तसेच अक्षरलेखन असे क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडवतात    ही रांगोळी काढण्यासाठी त्यांना किशोरी एगरे तसेच सोनाली चौधरी यांची मोलाची साथ लाभली
इमेज
  साप्ताहिक शुभकार्य=18/8/2024 कोरोचीत जिव्हेश्वर जन्मोत्सव उत्साहात साजरा     कोरोची -(उत्तम हुजरे) येथील श्री जिव्हेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री जिव्हेश्वर स्वकुळ साळी समाज कोरोची यांच्या वतीने श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला  पोथी वाचन, ओम नमः शिवाय, जप तसेच महिलांचा हळदी कुंकू  कार्यक्रम श्री जन्मोत्सव तसेच महाप्रसाद घेण्यात आला  यावेळी अध्यक्ष महेश मोटे, उपाध्यक्ष धनाजीराव पांढरपट्टे, दीपक शिवदास, विजय लाड, सुकुमार पांढरपट्टे, सागर बडवे, जगन्नाथ पांढरपट्टे, संदीप धारवट ,सुवर्णा बडवे, विजय बावणे, राहुल मांडवकर, राहुल डांगे, अवधूत रानभरे ,महेश कनोजे अनिल गवते यांच्यासह सर्व समाजबांधव महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते
इमेज
साप्ताहिक शुभकार्य=18/8/2024 सहारा फाउंडेशनने गुणवंत विद्यार्थ्यांना दिली कौतुकाची थाप उत्तम हुजरे -साप्ताहीक शुभकार्य   सामाजिक जाण व भान ठेवून सहारा फौंडेशन उपक्रम राबविते त्यामुळे त्यांचे कार्य आदर्शवत आहे."असे प्रतिपादन देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. एम.पाटील यांनी केले.     सहारा फाउंडेशनच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणा सन्मान ने सन्मानित केले त्या समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.प्रमुख पाहुणे म्हणून व्यंकटेश सहकारी सूतगिरणीचे संचालक अशोकराव पाटील,पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रमोद पाटील उपस्थित होते.     सहारा फाउंडेशनचे अध्यक्ष महेश कांबळे यांनी स्वागत तसेच प्रास्ताविक सहारा फौंडेशन चे संस्थापक पापालाल सनदी यांनी केले यावेळी सहारा फाउंडेशन च्यावतीने राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.सरपंच शोभा पोवार,पंचायत समितीच्या माजी सभापती रेश्मा पापालाल सनदी,उपसरपंच सुधीर लिगाडे, मराठा समाजाचे अध्यक्ष प्रा.रवींद्र पाटील,प्रा. अप्पासाहेब वाघमारे,महावीर पिंपळे,अनिल हजारे यांनी मनोग...
इमेज
  साप्ताहिक शुभकार्य=17/8/2024                    संग्रहित छायाचित्र  रुई गावात  पुर्व वैमनस्यातून दोन समाजात तुंबळ हाणामारी   एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी     कोरोची -उत्तम हुजरे -साप्ताहीक शुभकार्य    कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील रुई गावांमध्ये पूर्व वैमनस्याच्या  वादातून दोन समाजा मध्ये  तुंबळ हाणामारी झाली या हाणामारी मध्ये सचिन बाबासाहेब कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली  या बाबत अधिक माहिती अशी की रूई गावातील एका स्पर्धेच्या निमित्ताने  गेल्या वर्षभरापासून या दोन समाजात वाद धुमसत होता त्यामुळे गेल्या वर्षभरापासून सुरू असलेला वाद मीटवण्यासाठी गेले असता पुन्हा त्या ठिकाणी वादाची ठिणगी पडली यातून शाब्दिक चकमक होत  त्यांचे रूपांतर तुंबळ हाणामारी मध्ये झाले असता त्यात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी आहे.   
इमेज
  साप्ताहिक शुभकार्य=16/8/2024 कोरोची ग्रामपंचायत कर्मचारी काम बंद आंदोलनाचे सरपंच संतोष भोरे यांना निवेदन देताना सर्व कर्मचारी  कोरोची ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन  सुरुवात कोरोची वार्ताहर: (उत्तम हुजरे)-  कोरोची ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे   विविध मागणीसाठी काम   बंद आंदोलन  सुरू करण्यात आले आहे  या आंदोलणास ग्रामपंचायतीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. कोरोची ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन आज  शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट पासून करण्यात आले आहे अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामपंचायतीशी संबंधित सरपंच , ग्रामसेवक , ग्रामपंचायत कर्मचारी , ग्रामरोजगार सेवक , संगणक परिचालक यांनी बेमुदत काम बंद आंदोलन केलेले आहे . ग्रामपंचायत घटकांच्या प्रमुख मागण्या अश्या करण्यात आल्या आहेत की नियमित व सन्मानजनक मानधन , भत्ता मिळावे  सरपंचांना १५ हजार , उपसरपंचांना १० हजार , तर सदस्याला तीन हजार मानधन मिळावे  ग्रामपंचायत संबंधित सर्व घटकांना विमा , पेन्शन , निश्चित वेतन लागू करावे  मुंबईत ...
इमेज
  विधानसभेसाठी डॉ. राहुल आवाडे मैदानात     आमदार प्रकाश आवाडे यांची घोषणा     उत्तम हुजरे -कोरोची आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इचलकरंजी मतदारसंघातून राहुल आवाडे निवडणूक लढवतील अशी घोषणा स्वातंत्र्य दिनाचे अवचित साधत आमदार प्रकाश आवाडे यांनी केले     महायुतीकडून सन्मानाने तिकीट मिळाल्यास ठीक अन्यथा स्वतंत्र ताराराणी पक्षाकडून उमेदवारी जाहीर करू असे आवाहन आमदार प्रकाश आवाडे यांनी आज केले
इमेज
  साप्ताहिक शुभकार्य=15/8/2024 लोकमान्य नगर विद्यामंदिर भाग शाळा यांच्यावतीने स्वातंत्र्य दिन साजरा     कोरोची-उत्तम हुजरे   येथील लोकमान्य नगर विद्यामंदिर भाग शाळा यांच्यावतीने 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला      कोरोची ग्रामपंचायत उपसरपंच पूजा टेळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली     यावेळी. ग्रामपंचायत सदस्य सतीश सूर्यवंशी, आनंदी आमते, संगीता मगदूम ,भागातील ज्येष्ठ नागरिक शांतिनाथ पाटील, माजी सरपंच मनोहर खारकांडे, सनी ओऊळकर, मुख्याध्यापक बाबासाहेब डोळे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते
इमेज
  साप्ताहिक शुभकार्य=15/8/2024 रत्नदीप हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, गंगानगर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात    उत्तम हुजरे -साप्ताहीक शुभकार्य  भारताचा 78 स्वातंत्र्य दिन रत्नदीप हायस्कूलच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुमार विद्यामंदिर, गंगानगरच चे स्कूलकमिटी चेअरमन श्री अशोक पाटील होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.                 यावेळी कुमार विद्यामंदिर व  भाग शाळा तसेच रत्नदीप हायस्कूलच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी देशभक्तिपर गीत व नृत्य सादर केले.                    कार्यक्रमास प्रशालेचे मुख्याध्यापक एस.पी.दीक्षित सर, मुख्याध्यापक विजय भोजे सर, पर्यवेक्षक सलगर सर, सर्व शिक्षक शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी, पालक व आजी, माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.                 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री ए.व्ही. यादव सर यांनी केले तर आभार क्रीडा विभाग ...
इमेज
  साप्ताहिक शुभकार्य=13/8/2024        श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव निमित्त कोरोचीत कार्यक्रम      कोरोची -(उत्तम हुजरे)- साप्ताहिक शुभकार्य  येथील श्री जिव्हेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री जिव्हेश्वर स्वकुळ साळी समाज कोरोची यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शनिवार दिनांक 16 रोजी सकाळी नऊ ते दहा या वेळेत जिव्हेश्वर हॉलमध्ये श्री जिव्हेश्वर पारायण चे आयोजन,  तसेच शनिवार दिनांक 17 रोजी पहाटे 5 ते 6 या वेळेत श्रीकांत सरदार हुपरे यांचे पोथी वाचन, पहाटे 6 वाजून 22 मिनिटांनी श्री भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सव, सकाळी 7 ते 8 वाजता ओम नमः शिवाय जप, सकाळी 8 ते 9 वाजता महिलांचा हळदी  कुंकवांचा  कार्यक्रम तसेच दुपारी 12 वाजता महाप्रसाद संपन्न होणार असल्याने श्री जिव्हेश्वर स्वकुळ साळी समाज कोरोची यांच्यातर्फे होणाऱ्या जन्मोत्सव कार्यक्रमास सर्व साळी समाज बांधवांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे    
इमेज
  साप्ताहिक शुभकार्य=13/8/2024 कोरोची सरपंच संतोष भोरे अखेर ठरले पात्र    पुणे आयुक्तांनी दिला निकाल     कोरोची-( उत्तम हुजरे)-साप्ताहीक शुभकार्य  कोरोची येथील 2022-27 सालातील पंचवार्षिक निवडणुकीसाठी लोकनियुक्त सरपंच पदासाठी संतोष भोरे यांच्यासह सहा जणांनी अर्ज दाखल केला होता सदरच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार संतोष भोरे लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आले    निवडून आल्यानंतर सरपंच भोरे यांनी सरपंच पदासाठी राहिलेल्या पराजित उमेदवारांना कॅव्हेट दाखल केले होते त्या कॅव्हेट च्या विरोधात जाऊन पराजित उमेदवारांनी संतोष भोरे यांच्या वरती अतिक्रमण बाबत सरपंच पद अपात्र ठरवण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज क्रमांक 3/2023  दाखल केला होता त्यास जिल्हाधिकारी यांनी आदेश देत जानेवारी 2024 मध्ये संतोष भोरे यांचे सरपंच पद अपात्र ठरवले होते    त्या दिलेल्या निर्णयाच्या विरोधात जाऊन संतोष भोरे यांनी अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे अपील दाखल केले असता पुणे आयुक्तांनी 18 जुलै 2024 पर्यंत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला स्थगिती दिली हो...
इमेज
  साप्ताहिक शुभकार्य=13/8/2024 बेडकिहाळ  ची शान उषाराणी हत्तीचा मृत्यू  उत्तम हुजरे -(साप्ताहिक शुभकार्य)    बेडकिहाळ ची शान उषाराणी हत्तीचा ५१ व्या वर्षी शनिवारी ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. उषाराणी हतीं वर बेडकिहाळ व परिसरातील  ना गरिकांचे खुप प्रेम होते. उषाराणीचा मृत्यू झा ल्यामुळे बेडकिहाळ व  परिसरातुन  हळहळ व्यक्त होत आहे.आचार्य रत्न श्री १०८ देशभूषण महाराज यांच्या कुप्पनवाडी शांतीगिरी  आश्रमातील बेडकिहाळ गावात १९७१ मध्ये सर्केबैल ( शिमोगा येथून वयाच्या ६ व्या वर्षी एक हत्ती आणण्यात 'आला होता. बेडकिहाळ गावचे संदिप पाटील यांच्या शेतात हत्ती राहत होता. ऐतिहासिक दसरा उत्सव, दिवाळी आणि पालखी सोहळ्यासह जैन समाजाच्या पंचकल्याण महोत्सव कार्यक्रमात सहभाग असायचा. उषाराणीची ओळख धार्मिक कार्यक्रमातच नाही तर चित्रपट आणि मालिकांमध्येही होती. स्वामी समर्थ चित्रपट, जानता राजा महानाट्य, राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या मालिकेने आपली छाप पाडली होती. श्री स्वामीजी आणि माहूत बसु लक्ष्मेश्वर यांनी उषाराणी हत्तीला अखेरची श्रध्दांजली वाहिली.
इमेज
  साप्ताहिक शुभकार्य=12/8/2024 कोरोचीत न्यू मिलिनियम स्कूलच्या संस्थापिका विजया मोहन यांच्यावरती गुन्हा दाखल 3  अनोळखी इसमांना घेऊन  कंपनीच्या सेक्युरिटी गार्डला केली दमदाटी      कोरोची -साप्ताहिक शुभकार्य -(उत्तम हुजरे)   कोरोची येथील गट नंबर 773 मधील जनरेशन इनोव्हेटिव्ह स्कूल व न्यू मिलेनियम पब्लिक स्कूल या स्कूलला 19 -12 - 2020 रोजी संस्थेच्या डेव्हलपिंग साठी तीन करोड तीन लाख रुपये इतकी  रक्कम प्रोफेक्टस  प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी कडुन   कर्ज स्वरूपात संस्थेच्या संस्थापिका विजया मोहन व राम्या मोहन यांना कर्ज घेतले  होते सदरचे घेतलेले कर्जाचे हप्ते न वेळेत फेडल्यामुळे  प्रोफेक्टस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी शिक्षण संस्थेस  सिल केले होते आज दिनांक12 ऑगस्ट रोजी शिक्षण संस्थेला सिल व नोटीस असुन त्या ठिकाणी  संस्थापिका विजया मोहन जाऊन त्या   संस्थेच्या  प्रवेश द्वाराजवळ असलेल्या कंपनीच्या सेक्युरिटी गार्डला दमदाटी करत बँकेने केलेल्या सील व नोटीस ला न जुमानता शिक्षण संस्थ...
इमेज
  साप्ताहिक शुभकार्य-10/8/2024 श्री आदिनाथ को ऑप बँक इचलकरंजी या बँकेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा  साप्ताहिक शुभकार्य (उत्तम हुजरे )- आदिनाथ बँकेचे चेअरमन सुभाष काड्डापा यांच्या अध्यक्षतेखाली व सहकार महर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादा, क आवाडे इचलकरंजी जनता सह बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे, उत्तम आण्णा आवाडे, सौ वैशालीताई आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा  मोठ्या उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरण पार पडली. यावेळी नवमहाराष्ट्र सह सुत गिरणी चे माजी चेअरमन सुधाकर मणेरे, गुंडाप्पा रोजे, देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पी. एम. पाटील, मिलिंद कोले, बँकेचे व्हा चेअरमन बाळासाहेब चौगुले, संचालक मधुकर मणेरे , श्रेणिक मगदूम, चंद्रकांत मगदूम, सुदर्शन खोत, अनिल बमन्नावर, संपत कांबळे, सचिन हेरवाडे, सुकुमार पोते, सुचित हेरवाडे, सौ मंगल देवमोरे, सौ अनिता चौगुले, उमेश कोळी, पवन उपाध्ये, सतीश मगदूम, सी ई ओ जिवंधर चौगुले, जयकुमार उपाध्ये यांच्यासह सभासद व बँकेचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इमेज
  साप्ताहिक शुभकार्य=10/8/2024 इचलकरंजी मध्ये सुताची 200 बॉक्स चोरणाऱ्याला शहापूर पोलिसांनी घेतले ताब्यात: 43 लाख 71 हजाराचा मुद्देमाल हस्तगत कोरोची (उत्तम हुजरे)------ इचलकरंजी मध्ये आयशर गाडी सह 61 कोंबड कॉम्पॅक्ट चे 200 बॉक्स चोरून येणाऱ्या अभिजीत महावीर खोत वय वर्ष 32 राहणार गणेश नगर शहापूर याला शहापूर पोलिसांनी 200 सुताचे बॉक्स व आईशर गाडी असा एकूण 43 ला 71 हजार 414 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे तर याबाबतची फिर्याद आकाश महावीर खोत राहणार गणेश नगर शहापूर यांनी शहापूर पोलिसात दिली आहे तर पोलिसातुन मिळालेली अधिक माहिती अशी की आकाश खोत यांनी आयशर एम एच 11 एल 26 09 व KA 23 A 4975 या गाडी शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी सुताचे बॉक्स भरून अरिहंत पार्किंग येथे लावली होती तर चार ऑगस्ट ते पाच ऑगस्ट च्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने या ठिकाणाहून टेम्पो चोरून नेल्याची फिर्याद आकाश खोत यांनी शहापूर पोलिसात दिली होती तपास करताना गोपनीय तपासाच्या आधारे माहिती काढली असता फिर्यादी आकाश खोत याचा भाऊ अभिजीत खोत याला पोलिसांनी ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता त्याने सदर गुन्हा केला अ...
इमेज
  साप्ताहिक शुभकार्य=9/8/2024 कोरोची ग्रामपंचायत ठिकाणी बीडीओ मोकाशी मॅडम व रामन्ना साहेब तसेच पोवार साहेब यांचा सत्कार करताना ग्रामविकास अधिकारी अनंत गडदे  . बी डी.ओ मोकाशी मॅडम यांनी केले कोरोची ग्रामपंचायतीचे कौतुक    कोरोची- (उत्तम हुजरे)-   कोरोची ग्रामपंचायत या ठिकाणी बी.डी.ओ मोकाशी मॅडम आणि विस्तार अधिकारी रामन्ना साहेब  व पोवार साहेब यांनी अचानकच भेट दिली असता ग्राम विकास अधिकारी अनंत गडदे यांनी त्यांचे स्वागत केले   सदरच्या भेटी अंतर्गत ग्रामपंचायत मधील दप्तर तपासणी करून तसेच विकास कामाचा आढावा, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन बाबत माहिती , अपूर्ण घरकुल, व अनुजाती व नवबौद्ध वस्तीतील मंजूर कामे याबाबत नियोजन व निधी खर्च करणे तसेच हर  घर तिरंगा अभियान यशस्वी करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले   त्यावेळी मोकाशी मॅडम  यांनी  कोरोची ग्रामपंचायतीने घरफाळा वसुली करत   एक आदर्श दिला असून सरपंच संतोष भोरे व ग्रामविकास अधिकारी अंनत गडदे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी कौतुक यांचे केले अशीच कामकाजाची सातत्य ठेवून कोरोची गाव...
इमेज
साप्ताहिक शुभकार्य -9/8/2024         दे.भ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या    समाधीस्थळावरती पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले रत्नदीप हायस्कूलच्या वतीने नऊ ऑगस्ट क्रांती दिन हुतात्म्यांना अभिवादन    कबनूर -(उत्तम हुजरे)-  येथील रत्नदीप हायस्कूल ज्युनिअर कॉलेज व कुमार विद्यामंदिर गंगानगर कबनूर यांच्या वतीने 9 ऑगस्ट क्रांती दिन व हुतात्मा दिनाच्या निमित्ताने  सकाळी हायस्कूल मध्ये फोटो पूजन करत हुतात्म्यांना अभिवादन केले   त्यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी नऊ ऑगस्ट क्रांती दिना वरती आपले मनोगते व्यक्त केली   तसेच या क्रांती दिनाच्या निमित्ताने देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या समाधीस्थळावरती जाऊन  मुख्याध्यापक एस पी दीक्षित सर यांच्या हस्ते त्यांना पुष्पहार घालून  अभिवादन करण्यात आले  यावेळी  रत्नदीप हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे तसेच कुमार विद्यामंदिर चे सर्व शिक्षक, शिक्षिका ,विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते
इमेज
  श्रीराम मंदिराचा भूमिपूजन व पायाभरणी शुभारंभ करताना जि.प.सदस्य राहुल आवाडे  कोरोची श्रीराम मंदिराचा जिर्णोद्धार शुभारंभ कोरोची-    कोरोची छत्रपती शिवाजीनगर येथील श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार शुभारंभ भूमिपूजन व पायाभरणी शुभारंभ जि प सदस्य राहुल आवाडे यांच्या हस्ते संपन्न झाला   यावेळी राहुल आवाडे बोलताना म्हणाले कोरोची नगरीच्या भरीव  विकासासाठी व धार्मिक कार्यासाठी लागेल ती मदत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत   यावेळी सरपंच संतोष भोरे, जि प सदस्य प्रसाद खोबरे, फोरजी उपसरपंच पूजा टेळे, उद्योगपती विजय चव्हाण, पांडुरंग धोंडपुडे, विनायक बचाटे  माजी जलस्वराज प्रकल्प अध्यक्ष रमेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य शीतल पाटील, साहेबलाल शेख, युवा महाराष्ट्र सेना संस्थापक सैमआठवले, माजी.उपसरपंच अभिनंदन पाटील, माजी सरपंच मनोहर खारकांडे, सामाजिक कार्यकर्ते बंडा पाटील, श्री दत्तकृपा गृहनिर्माण सहकारी संस्था चेअरमन रवींद्र शिंदे यांच्यासह श्रीराम मंदिर जिर्णोद्धार समितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शिवाजीनगर भागातील सर्व ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते
इमेज
  साप्ताहिक शुभकार्य=9/8/2024 कोरोचीत हुतात्म्यांना अभिवादन कोरोची वार्ताहर :कोरोची येथे ग्रामपंचायत यांच्यावतीनेे  9 ऑगस्ट क्रांती दिना निमित्त व हुतात्मदिनानिमित्त जिल्हा परिषद कुमार विद्यामंदिर येथे स्थापित करण्यात आलेल्या हुतात्मा शिलालेखास अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सरपंच डॉ. संतोष  भोरे यांच्या हस्ते हुतात्मा शिलालेखाचे पूजन करण्यात आले व ग्राम विकास अधिकारी आनंद गडदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मानवंदना व शपथ घेण्यात आली.यावेळेस डॉ . संतोष भोरे व ग्रामविकास अधिकारी अंनत गडदे यांनी शहीद झालेल्या हुतात्म्यांना अभिवादन करून 13 ऑगस्ट 2024 ते 15 ऑगस्ट 2024 पर्यंत सर्वांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकून या तीन दिवसात विविध कार्यक्रमाचे आयोजन करावे असे आवाहन केले. यावेळी पोलीस पाटील सावकर हेगडे, तंटामुक्त अध्यक्ष, नितीन चौगुले, ग्रामपंचायत सदस्य साहेबलाल शेख, मुख्याध्यापक बाबासाहेब डोळे, दीपक माने, राजकुमार मिरजकर, रशीद  ढालाईत, यांच्यासह ग्रामस्थ शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
इमेज
  साप्ताहिक शुभकार्य=7/8/2027 सिटी प्राईड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ने केली मुख्यमंत्री सहायता निधीतून 80000ची मदत  कागल - कागल येथील सिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ने गरिबांच्या पाठीशी राहून रुग्णांना आपलेसे केले आहे   गोरंबे गावातील श्रीमती गणपती पाटील व वर्षे 75 या महिलेचे दिनांक 6/8/2024 रोजी अपघात झाला असता त्यांना सिटी हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता दाखल केल्यानंतर त्यांच्या मांडीवरची शस्त्रक्रिया सिटी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चे सर्वेसर्वा डॉक्टर तुषार भोसले व त्यांच्या सर्व सहकार्याने यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पाडत तसेच त्यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून 80,000 ची मदत करत पाटील  परिवारा वरती मदतीचा हात दिला    कागल मधील सिटी हॉस्पिटल या ठिकाणी अशा अनेक यशस्वी शस्त्रक्रिया करत डॉक्टर तुषार भोसले यांनी गरिबांच्या पाठीशी उभे राहिले आहे    त्यांच्या या कार्याने कागल परिसरात त्याचे कौतुक होत आहे
इमेज
  साप्ताहिक शुभकार्य=7/8/2024 कोरोचीतील न्यू मिलीनियम इंग्लिश स्कूल शिक्षण संस्थेला खाजगी कंपनीने केले सील  2 कोटी 79लाख 79हजार 665 रुपये थकीत* कोरोची- कोरोची येथील खाजगी शिक्षण संस्था श्रीनिवास एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू मिलेनियम इंग्लिश स्कूल या शिक्षण संस्थेला पुणे येथील खाजगी कंपनीने करून मालमत्ता ताब्यात घेतली आहे या घटनेने पालक व विद्यार्थी वर्गात मोठी खळबळ माजली आहे   याबाबत अधिक माहिती अशी की कोरोची भागातील  विजया मोहन यांची खाजगी शिक्षण संस्था  असलेली न्यू मिलेनियम इंग्लिश स्कूलला पुण्यातील प्रोफेक्ट कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड पुणे या खाजगी फायनान्स कंपनीने दिनांक 11 मे 2023 रोजी स्कूल ला डिमांड नोटीस दिली होती त्या नोटीसमध्ये शिक्षण संस्थेसाठी दिलेली 2  कोटी 79 लाख 79 हजार 665 रुपये नमूद केलेली रक्कम ही नोटीस मिळाल्यापासून साठ दिवसाच्या आत परतफेड करण्याचे आवाहन केले होते सदरची कर्ज रक्कम परतफेड करण्यात अयशस्वी झाल्यामुळे 6 ऑगस्ट रोजी कंपनीने नोटीस लागु करत सील करून सदरची शिक्षण संस्था व सर्व मालमत्ता ताब्यात घेऊन व्यवहार न करण्याची खबरदारी दिली ...
इमेज
 साप्ताहिक शुभकार्य=7/8/2024 कोरोची जिल्हा परिषद शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा चे उद्घाटन    कोरोची -कोरोची येथील ग्रामपंचायत  फंडातून जिल्हा परिषद शाळा असलेली कुमार विद्यामंदिर व कन्या विद्या मंदिर कोरोची तसेच लोकमान्य नगर भागशाळा या शाळेला कोरोची ग्रामपंचायत फंडातून सीसीटीव्ही कॅमेरे देण्यात आले   या सीसीटीव्ही कॅमेरा चा उद्घाटन सोहळा कोरोची सरपंच डॉ संतोष भोरे यांच्या हस्ते करण्यात आले   यावेळी सरपंच भोरे बोलताना म्हणाले को रोची नगरीतील जिल्हा परिषद शाळेचा शिक्षणाचा दर्जा वाढावा तसेच शिक्षण संस्थेवर ती अंकुश राहावा व शिक्षण संस्था चांगल्या प्रकारे चालावी  यासाठी ग्रामपंचायत फंडातून आज कोरोची नगरीतील दोन जिल्हा परिषद शाळांना सीसीटीव्ही देण्यात आले     इथून पुढे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लागिल ती शाळेला मदत  करण्याचे आश्वासन ही यावेळी सरपंच भोरे यांनी दिले   यावेळी उपसरपंच पुजा टेळे, ग्रामपंचायत सदस्य विकी माने,संजय शहापुरे ,स्नेहल कोरोचीकर, संगिता मगदूम, अश्विनी चव्हाण, अमर कोरोचीकर, असलम सनदी यांच्या सह कुमार विद्यामंदिर व क...
इमेज
 साप्ताहिक शुभकार्य=6-8-2024 कोरोचीत घरफाळा व पाणीपट्टीची जप्तीची धडक मोहीम सुरू    कोरोची येथील ग्रामपंचायत च्या वतीने घरफाळा व पाणीपट्टी वसुली विरोधात कारखानदार तसेच उद्योजक व ग्रामस्थांच्या घरी जाऊन घरफाळा व पाणीपट्टी वसुली चालू केली असून कारखानदारांचे व थकितदारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत   काही थकीत कारखानदार ग्रामपंचायत मध्ये येऊन थकीत घरफाळा व पाणीपट्टी भरण्यास सुरुवात केली आहे   कोरोची ग्रामपंचायतीच्या च्या वतीने सुरू असलेल्या जप्ती मोहीम मध्ये ग्रामविकास अधिकारी अनंत गडदे व त्यांच्या जप्ती वसुली पथकाने थकीत कारखानदार व ग्रामस्थ यांच्या घरी जाऊन त्यांना 24 तासांचा अवधी देत थकीत घरफाळा व पाणीपट्टी भरून सहकार्य करावे अन्यथा उद्या बुधवार दिनांक 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजल्यानंतर जे कोणी थकीत घरफाळा व पाणीपट्टी भरली नाही त्यांना पोलीस बंदोबस्तात त्यांचा व्यवसाय व कारखाना सील करून जोपर्यंत थकित घरफाळा व पाणीपट्टी भरत नाहीत तोपर्यंत कारखान्याला टाळे ठोकून सील केले जाईल तरी सर्व थकितदारांनी लवकरात लवकर आपला थकीत घरफाळा व पाणीपट्टी भरून ग्रामपंचायत सहकार्य करावे असे ...
इमेज
 साप्ताहिक शुभकार्य=5-8-2024 गावच्या विकासासाठी घरफाळा व पाणीपट्टी भरून सहकार्य करावे सरपंच-संतोष भोरे     कोरोची -येथील गावचा विकास साधण्यासाठी कचरा उठाव, दिवाबत्ती , तसेच पाणी योजना व्यवस्थित चालवण्यासाठी घरफाळा व  पाणीपट्टी भरून नागरिकांनी सहकार्य करावे    कोरोची नगरीची वाढती लोकसंख्या पाहता लाईट बिल, कर्मचारी पगार, तसेच पाणी योजना चालवण्यासाठी लागणारे सामग्री  तसेच विकासकामा साठी लागणारा निधी ग्रामपंचायती कडे अपुरा पडत असल्यामुळे  विकास कामांची पूर्तता होत नसल्याने ग्रामपंचायतीस अडचण येत आहे तरी कोरोची नगरीतील सर्व नागरिकांनी,उद्योजकांनी ,कारखानदारांनी आपला घरफाळा व पाणीपट्टी भरून ग्रामपंचायतीस  लवकरात लवकर सहकार करावे अन्यथा होणाऱ्या कारवाईमध्ये ग्रामपंचायत मधील कोणताही लोकप्रतिनिधी हस्तक्षेप करणार नसल्याने होणाऱ्या कारवाईला सामोरे जावे लागेल कारवाईला सामोरे न जाता ग्रामपंचायतीस सहकार्य करावे असे मत कोरोची सरपंच डॉ. संतोष भोरे यांनी व्यक्त केले
इमेज
साप्ताहिक शुभकार्य=5/8/2024  घरफाळा व पाणीपट्टी भरून ग्रामपंचायतीस सहकार्य करावे अन्यथा उद्यापासून जप्तीची मोहीम सुरू ग्राम विकास अधिकारी अनंत गडदे     कोरोची- येथील कोरोची ग्रामपंचायत यांच्या वतीने आवाहन करण्यात येते की कोरोची नगरीतील नागरिकांनी थकित घर फाळा व पाणीपट्टी भरून ग्रामपंचायत सहकार्य करावे अन्यथा जप्तीची मोहीम राबवण्यात येणार असून थकबाकीदारांना या  कारवाईला सामोरे जावे लागेल असे आवाहन कोरोची ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी अनंत गडदे यांनी आज ग्रामपंचायत च्या वतीने केले     कोरोची गावची लोकसंख्या 55 ते 56 हजाराच्या वरती असून गावचा विकास तसेच पाणी योजना  चालवण्यासाठी    घरफाळा दीड कोटी रुपये थकीत असल्याने आणि पाणी बिल 80  लाख रुपये येणे असल्याने सदरची योजना चालवण्यासाठी आणि गावचा विकास साधण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे    पाणी योजना चालवण्यासाठी टि सी एल तुरटी, तसेच कर्मचारी पगार व लाईट बिल यासाठी महिना 10 लाख रुपये लागतात तर ही योजना चांगल्या पद्धतीने चालली  जाईल सध्या गावात पाच हजाराच्या वरती नळ कनेक्शन असल्य...
इमेज
  साप्ताहिक शुभकार्य...2/8/2024 इचलकरंजी आगार प्रमुखांना निवेदन देताना कोरोची काँग्रेसचे पदाधिकारी कोरोची काँग्रेसच्या वतीने इचलकरंजी आगार प्रमुखांना निवेदन कोरोची-येथील नागरिकांना व महिला वर्गांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना इचलकरंजीला येण्या जाण्यासाठी बस सेवा सुरू करावी यासाठी कोरोची काँग्रेस कमिटीच्या वतीने  निवेदन इचलकरंजीचे आगारप्रमुख सागर पाटील यांना देण्यात आले.     यावेळी कोरोची काँग्रेस अध्यक्ष पोपट शिंदे , रशिद ढालाईत, चंद्रकांत आवळे,संजय शिंदे (मेजर),अस्लम सनदी , सौ.शिरसाटे , बाबासाहेब कोतवाल,राजु आवळे , ओंकार आवळकर, राजु काटकर प्रवीण पाटील,सुनील यादव , संतोष भिसे ,अविनाश बालीकाई,बाळु पवार यांचेसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
इमेज
  साप्ताहिक शुभकार्य -2/8/2024 लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करताना रत्नदीप हायस्कूलचे मुख्याध्यापक एस पी दीक्षित सर तसेच सर्व शिक्षक विद्यार्थी  रत्नदीप हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, गंगानगर येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी.        उत्तम हुजरे-  गंगानगर- कबनूर येथील रत्नदीप हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक एस.पी.दीक्षित होते.         मान्यवरांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कु. गौरी मुसंडी हिने केले तर नेहा म्हेतर,वैष्णवी वास्कर, अवनिता कांबळे तसेच ज्येष्ठ शिक्षक ए.व्ही. यादव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.           कार्यक्रमास शिक्षक, शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.             कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती आंबी हिने केले तर आभार त्रिवेण...