साप्ताहिक शुभकार्य=12/8/2024
कोरोचीत न्यू मिलिनियम स्कूलच्या संस्थापिका विजया मोहन यांच्यावरती गुन्हा दाखल
3 अनोळखी इसमांना घेऊन कंपनीच्या सेक्युरिटी गार्डला केली दमदाटी
कोरोची -साप्ताहिक शुभकार्य -(उत्तम हुजरे)
कोरोची येथील गट नंबर 773 मधील जनरेशन इनोव्हेटिव्ह स्कूल व न्यू मिलेनियम पब्लिक स्कूल या स्कूलला 19 -12 - 2020 रोजी संस्थेच्या डेव्हलपिंग साठी तीन करोड तीन लाख रुपये इतकी रक्कम प्रोफेक्टस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी कडुन कर्ज स्वरूपात संस्थेच्या संस्थापिका विजया मोहन व राम्या मोहन यांना कर्ज घेतले होते सदरचे घेतलेले कर्जाचे हप्ते न वेळेत फेडल्यामुळे प्रोफेक्टस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी शिक्षण संस्थेस सिल केले होते आज दिनांक12 ऑगस्ट रोजी शिक्षण संस्थेला सिल व नोटीस असुन त्या ठिकाणी संस्थापिका विजया मोहन जाऊन त्या संस्थेच्या प्रवेश द्वाराजवळ असलेल्या कंपनीच्या सेक्युरिटी गार्डला दमदाटी करत बँकेने केलेल्या सील व नोटीस ला न जुमानता शिक्षण संस्थेत बेकायदेशीर प्रवेश केला त्यामुळे सेक्युरिटी गार्ड पंकज तानाजी पाटील यांनी शहापूर पोलीस ठाणे या ठिकाणी फिर्याद दाखल करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला
याबाबत अधिक तपास शहापूर पोलीस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल भंडारे सर पाहत आहेत

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा