कोरोची सह परिसरात वटपोर्णिमा उत्साहात साजरी कोरोची- उत्तम हुजरे कोरोची- हिंदू पंचांगानुसार मराठी महिन्यातील तिसरा महिना हा ज्येष्ठ महिना ओळखला जातो ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला वटपोर्णिमा साजरी केली जाते पतीच्या दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी वट वृक्षाचे पूजन करून उपवास धरला जातो वटवृक्षाचे पूजन करून वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारुन पतीला दीर्घायुष्य लाभो आणि हाच पती सात जन्म मिळावा म्हणून मनोभावी प्रार्थना केली जाते हा पवित्र सर महिलांची पर्वणी ठरली जाते यावेळी कोरोची सह परिसरात महिलांची मोठी गर्दी दिसून येत होती
पोस्ट्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
समाजातील ढासाळणारा विवेक पाहता नव्या पिढीला संस्कार आणि नागरिकांचे प्रबोधन होण्याची जबाबदारी, जागृत व्यक्तींनी स्वीकारायला हवी.* - आमदार सतेज पाटील. *जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रंगराव सावंत यांचा जाहिर नागरी सत्कार* ----------------------------------- कोल्हापूर : चौफेर नजर फिरवली असता समाजातील अत्यंत नकारात्मकता, विद्वेष, दुष्टता जास्त जाणवायला लागली आहे. जात धर्म पंथ यांच्या द्वेष्यात वाढ झाल्याची दिसत आहे. विचारशील माणसांनी आणि कृतिशील नागरिकांनी समाज शिक्षणाचे कार्यक्रम अविरत आयोजित करण्याची गरज आहे. शाहू फुले आंबेडकरांचा विचार आणि संतांची शिकवण असणारा महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र वैचारिक मागास होऊ नये, याची आपण काळजी घेवु. आज सन्मानीत होणाऱ्या पुरस्कार्थींनी समाजप्रबोधनाची जबाबदारी खांद्यावर घ्यावी, असे मनोगत आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी व्यक्त केले. ते कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र आणि जागृत नागरिक सेवा संस्था, महाराष्ट्रद्वारा आयोजित राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 152 व्या जयंती निमित्त ...
*समाजातील ढासाळणारा विवेक पाहता नव्या पिढीला संस्कार आणि नागरिकांचे प्रबोधन होण्याची जबाबदारी, जागृत व्यक्तींनी स्वीकारायला हवी.* - आमदार सतेज पाटील.*जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रंगराव सावंत यांचा जाहिर नागरी सत्कार*-----------------------------------कोल्हापूर :चौफेर नजर फिरवली असता समाजातील अत्यंत नकारात्मकता, विद्वेष, दुष्टता जास्त जाणवायला लागली आहे. जात धर्म पंथ यांच्या द्वेष्यात वाढ झाल्याची दिसत आहे. विचारशील माणसांनी आणि कृतिशील नागरिकांनी समाज शिक्षणाचे कार्यक्रम अविरत आयोजित करण्याची गरज आहे. शाहू फुले आंबेडकरांचा विचार आणि संतांची शिकवण असणारा महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र वैचारिक मागास होऊ नये, याची आपण काळजी घेवु. आज सन्मानीत होणाऱ्या पुरस्कार्थींनी समाजप्रबोधनाची जबाबदारी खांद्यावर घ्यावी, असे मनोगत आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी व्यक्त केले. ते कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र आणि जागृत नागरिक सेवा संस्था, महाराष्ट्रद्वारा आयोजित राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 152 व्या जयंती निमित्त राज्य व राष्ट्रीय पुरस्कार 2026 कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी सर्व राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. आपल्या हस्ते समाजातील जनमाणसाचे कल्याणचे कार्य सुरु राहो आणि येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक विचार समाजात पाझरायला हवे असे मार्गदर्शन केले. दोन्ही मान्यवरांच्या हस्ते जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रंगराव नाना सावंत यांचा जाहिर नागरी सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर राज्यातील सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला क्रिडा, संघटना अध्यात्मिक, आरोग्य, पत्रकारीता, उद्योग, कृषी, योगा, शासकिय व निम शासकीय सेवेत वैशिष्ठयपूर्ण कार्य तसेच समाजातील वंचित व उपेक्षित घटकांसाठी सेवाभावीवृत्तीने उल्लेखनीय कामगिरी करतात, अशा कार्यकर्त्यांना समाज भूषण, समाज रत्न, आदर्श पत्रकार, आदर्श शिक्षक/शिक्षिका, कामगार भूषण, कामगार रत्न, सहकार भूषण, कला भूषण, कृषी रत्न, साहित्य भूषण, . उद्योग भूषण, उद्योग रत्न, आदर्श योग शिक्षक/शिक्षिका, आदर्श माता आदि. पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.यावेळी सखाराम जाधव - गोरक्षा संस्थेचे उपाध्यक्ष, प्रभाकर कांबळे - जेष्ठ सहकार तज्ञ, अनिल म्हमाने - अध्यक्ष निर्मिती विचारमंच, संदीप गुरव, राजेंद्र निकम, सचिन खराडे, संघसेन जगतकर तसेच राहूल चव्हाण - 2026 मधील जागतीक योगासन स्पर्धेत सिल्व्हर मेडल विजेता आदी. मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व दिप प्रज्वलनाने करणेत आली. मान्यवर पाहुण्यांचे ग्रंथ, पुष्पगुच्छ, फेटा व बॅच लावून स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सुरेश केसरकर यांनी केले. प्रास्ताविकामध्ये दोन्ही संस्थांच्या एकूणच कार्याचा आढावा विषद केला. तर आभार अनिता काळे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय सासने, संभाजी थोरात, भगवान माने, संजय चव्हाण, शिवाजी चौगुले, महादेव चक्के, रघुनाथ मुधाळे, दिनकर आडसूळ, सुभाष पाटील, संजय गुरव, सर्जेराव हळदकर, विजय आरेकर, स्वप्नील गोरंबे आदींनी विशेष सहकार्य केले.सदर पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कोरोची जलस्वराज्य पाणीपुरवठा प्रकल्पाचा हिशोब व दप्तर सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सामाजिक लेखापरीक्षण अध्यक्षांची- माजी अध्यक्ष रमेश पाटील कोरोची- उत्तम हुजरे कोरोची येथील 'जलस्वराज' पाणीपुरवठा योजनेवरून गेल्या काही दिवसांपासून गावात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून, राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर, गहाळ दप्तर जमा करणे बाबद ग्रामपंचायत यांनी काढलेल्या नोटीसावर पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका अत्यंत आक्रमकपणे मांडली. "मी पाणी पुरवठा समितीचा अध्यक्ष म्हणून लोकांची सेवा प्रामाणिकपणे केली आहे. मात्र, योजनेचे दप्तर (रेकॉर्ड) सांभाळण्याची तांत्रिक किंवा कायदेशीर जबाबदारी माझी नसताना ग्रामपंचायतीने हे दप्तर माझ्याकडे मागितलेच कसे?" असा रोखठोक आणि कायदेशीर सवाल त्यांनी उपस्थित केला यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना रमेश पाटील यांनी ग्रामपंचायत प्रशासनाने त्यांच्यावर केलेल्या दाव्यांमधील तांत्रिक आणि कायदेशीर त्रुटींवर बोट ठेवले. कोणत्याही शासकीय योजनेत कामांची आणि जबाबदाऱ्यांची स्पष्ट विभागणी क...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
साप्ताहिक शुभकार्य=2/10/2024 शिक्षक पति ने केला शिक्षिका पत्नीचा खून मुरगूड - येथील साई कॉलनीत रहात असलेल्या परशुराम पांडुरंग लोकरे या शिक्षकाने पत्नी सविता परशुराम लोकरे (वय 45) यांचा मंगळवार(दि.01) रोजी सकाळी घरगुती वादातुन डोक्यात वरवंटा मारुन खून केल्याची घटना घडली आहे.या घटनेची माहिती मिळताच मुरगूड पोलिसांनी घटना स्थळी भेट देऊन माहिती घेऊन आरोपीला आणि त्यांच्या अल्पवयीन मुलास पोलिसांनी अटक केली आहे. अधिक माहिती अशी की कागल तालुक्यातील मुरगुड येथे साई कॉलनीत पेशाने शिक्षक असलेले लोकरे कुंटुबिय दोन मुलासह रहात होते . गेल्या काही वर्षापासून त्यांच्यात घरगुती वाद चालू होता.मंगळवारी सकाळी पती पत्नीत कडाक्याचे भांडण झाले या रागातुन पती परशुराम याने पत्नी सविताच्या डोक्यात वरवंटा जोरात मारल्याने त्यातच त्यांचा मृत्यु झाला.या घटनेची माहिती मुरगूड पोलिसांना समजताच सहा.पोलिस निरीक्षक शिवाजी करे यांनी आपल्या पोलिस स्टाफसह घटना स्थळी भेट दिली.या वेळी अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांना या घटनेची माहिती दिली.तात्काळ अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री देस...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
साप्ताहिक शुभकार्य=1/10/2024 संदीप पाटील यांचा कोरोची नगरीला सार्थ अभिमान -संतोष भोरे उत्तम हुजरे -कोरोची कोरोची गावच्या माजी सभापती निर्मला महावीर पाटील यांचे सुपुत्र संदीप पाटील यांनी कोरोची नगरीचे नाव लौकिक करत महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत एमपीएससी परीक्षेमध्ये यश संपादन करून कोरोची नगरीचे नाव अभिमानाने उंचावले आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो आज कोरोची ग्रामपंचायत यांच्यावतीने त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो असे मत कोरोची सरपंच संतोष भोरे यांनी बोलताना व्यक्त केले कोरोची गावचे सुपुत्र संदीप महावीर पाटील यांची महाराष्ट्र राजपत्रित लोकसेवा आयोग अंतर्गत एमपीएससी परीक्षेमध्ये यश संपादन करून एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल रोजी ग्रामपंचायत यांच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच संतोष भोरे ग्रामसेवक अनंत गडदे ग्रामपंचायत सदस्या हालिमा सनदी, स्नेहल कोरोचीकर,कोमल कांबळे,आंनदी आमते, संगिता मगदूम, संगिता शेट्टी, अश्विनी चव्हाण, सदस्य सतिश सुर्यवंशी,संजय...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
साप्ताहिक शुभकार्य=10/9/2024 शहापूर पोलिसांनी मोटरसायकल चोरणाऱ्यांना घेतले ताब्यात चार मोटरसायकली हस्तगत उत्तम हुजरे -साप्ताहीक शुभकार्य शहापूर---- येथील पोलिसांनी मोटरसायकली चोरी करणाऱ्या शाहरुख जावेद जमादार वय वर्ष 25 राहणार जवाहर नगर इचलकरंजी हर्षवर्धन श्रीकांत काटे वय वर्ष 18 राहणार आंबेडकर नगर डेक्कन मिल जवळ अजय राजेंद्र सूर्यवंशी व 19 राहणार दत्तनगर भाटले मळा अजय संजय बोटे राहणार गणेशनगर शहापूर अशा चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चार मोटरसायकली असा एकूण एक लाख 43 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे तर पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की 24 ऑगस्ट रोजी हिरो होंडा सीडी डॉन काळ्या रंगाची मोटरसायकल ही राहत्या घरापासून कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरल्याची तक्रार शहापूर पोलिसात आली होती त्यानुसार शहापूर पोलिसांनी गोपनीय रित्या तपास करत माहिती काढत संशयतांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता मोटरसायकली चोरल्याचे संशयतांनी कबूल दिली तर त्यांच्या कब्जातून एकूण तीन मोटरसायकली व एक गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण...