साप्ताहिक शुभकार्य=1/10/2024


संदीप पाटील यांचा कोरोची नगरीला सार्थ अभिमान -संतोष भोरे 

उत्तम हुजरे -कोरोची

कोरोची गावच्या माजी सभापती निर्मला महावीर पाटील यांचे सुपुत्र संदीप पाटील यांनी कोरोची नगरीचे नाव लौकिक करत महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत एमपीएससी परीक्षेमध्ये यश संपादन करून कोरोची नगरीचे नाव अभिमानाने उंचावले आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो आज कोरोची ग्रामपंचायत यांच्यावतीने त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो असे मत कोरोची सरपंच संतोष भोरे यांनी बोलताना व्यक्त केले

   

कोरोची गावचे सुपुत्र  संदीप महावीर पाटील यांची महाराष्ट्र राजपत्रित लोकसेवा आयोग अंतर्गत एमपीएससी परीक्षेमध्ये यश संपादन करून एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल रोजी ग्रामपंचायत यांच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ  शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला 

    यावेळी सरपंच संतोष भोरे ग्रामसेवक अनंत गडदे ग्रामपंचायत सदस्या हालिमा सनदी, स्नेहल कोरोचीकर,कोमल कांबळे,आंनदी आमते, संगिता मगदूम, संगिता शेट्टी, अश्विनी चव्हाण, सदस्य सतिश सुर्यवंशी,संजय शहापूरे,विकी माने, यांच्या सह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट