कोरोची जलस्वराज्य पाणीपुरवठा प्रकल्पाचा हिशोब व दप्तर सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सामाजिक लेखापरीक्षण अध्यक्षांची- माजी अध्यक्ष रमेश पाटील कोरोची- उत्तम हुजरे कोरोची येथील 'जलस्वराज' पाणीपुरवठा योजनेवरून गेल्या काही दिवसांपासून गावात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून, राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर, गहाळ दप्तर जमा करणे बाबद ग्रामपंचायत यांनी काढलेल्या नोटीसावर पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका अत्यंत आक्रमकपणे मांडली. "मी पाणी पुरवठा समितीचा अध्यक्ष म्हणून लोकांची सेवा प्रामाणिकपणे केली आहे. मात्र, योजनेचे दप्तर (रेकॉर्ड) सांभाळण्याची तांत्रिक किंवा कायदेशीर जबाबदारी माझी नसताना ग्रामपंचायतीने हे दप्तर माझ्याकडे मागितलेच कसे?" असा रोखठोक आणि कायदेशीर सवाल त्यांनी उपस्थित केला यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना रमेश पाटील यांनी ग्रामपंचायत प्रशासनाने त्यांच्यावर केलेल्या दाव्यांमधील तांत्रिक आणि कायदेशीर त्रुटींवर बोट ठेवले. कोणत्याही शासकीय योजनेत कामांची आणि जबाबदाऱ्यांची स्पष्ट विभागणी क...
या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट
समाजातील ढासाळणारा विवेक पाहता नव्या पिढीला संस्कार आणि नागरिकांचे प्रबोधन होण्याची जबाबदारी, जागृत व्यक्तींनी स्वीकारायला हवी.* - आमदार सतेज पाटील. *जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रंगराव सावंत यांचा जाहिर नागरी सत्कार* ----------------------------------- कोल्हापूर : चौफेर नजर फिरवली असता समाजातील अत्यंत नकारात्मकता, विद्वेष, दुष्टता जास्त जाणवायला लागली आहे. जात धर्म पंथ यांच्या द्वेष्यात वाढ झाल्याची दिसत आहे. विचारशील माणसांनी आणि कृतिशील नागरिकांनी समाज शिक्षणाचे कार्यक्रम अविरत आयोजित करण्याची गरज आहे. शाहू फुले आंबेडकरांचा विचार आणि संतांची शिकवण असणारा महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र वैचारिक मागास होऊ नये, याची आपण काळजी घेवु. आज सन्मानीत होणाऱ्या पुरस्कार्थींनी समाजप्रबोधनाची जबाबदारी खांद्यावर घ्यावी, असे मनोगत आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी व्यक्त केले. ते कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र आणि जागृत नागरिक सेवा संस्था, महाराष्ट्रद्वारा आयोजित राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 152 व्या जयंती निमित्त ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा