साप्ताहिक शुभकार्य=10/9/2024
शहापूर पोलिसांनी मोटरसायकल चोरणाऱ्यांना घेतले ताब्यात
चार मोटरसायकली हस्तगत
उत्तम हुजरे -साप्ताहीक शुभकार्य
शहापूर----
येथील पोलिसांनी मोटरसायकली चोरी करणाऱ्या शाहरुख जावेद जमादार वय वर्ष 25 राहणार जवाहर नगर इचलकरंजी हर्षवर्धन श्रीकांत काटे वय वर्ष 18 राहणार आंबेडकर नगर डेक्कन मिल जवळ अजय राजेंद्र सूर्यवंशी व 19 राहणार दत्तनगर भाटले मळा अजय संजय बोटे राहणार गणेशनगर शहापूर अशा चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चार मोटरसायकली असा एकूण एक लाख 43 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे तर पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की 24 ऑगस्ट रोजी हिरो होंडा सीडी डॉन काळ्या रंगाची मोटरसायकल ही राहत्या घरापासून कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरल्याची तक्रार शहापूर पोलिसात आली होती त्यानुसार शहापूर पोलिसांनी गोपनीय रित्या तपास करत माहिती काढत संशयतांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता मोटरसायकली चोरल्याचे संशयतांनी कबूल दिली तर त्यांच्या कब्जातून एकूण तीन मोटरसायकली व एक गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण एक लाख 43 हजार रुपये किमतीच्या मोटरसायकली हस्तगत करण्यात आले आहेत तर सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील अविनाश मुंगसे अर्जुन फातले रोहित डावळे असिफ कलाईगार शशिकांत ढोणे सतीश कुमार गायकवाड आदींच्या पथकाने केली


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा