साप्ताहिक शुभकार्य=15/8/2024
रत्नदीप हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, गंगानगर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात
उत्तम हुजरे -साप्ताहीक शुभकार्य
भारताचा 78 स्वातंत्र्य दिन रत्नदीप हायस्कूलच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुमार विद्यामंदिर, गंगानगरच चे स्कूलकमिटी चेअरमन श्री अशोक पाटील होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी कुमार विद्यामंदिर व भाग शाळा तसेच रत्नदीप हायस्कूलच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी देशभक्तिपर गीत व नृत्य सादर केले.
कार्यक्रमास प्रशालेचे मुख्याध्यापक एस.पी.दीक्षित सर, मुख्याध्यापक विजय भोजे सर, पर्यवेक्षक सलगर सर, सर्व शिक्षक शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी, पालक व आजी, माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री ए.व्ही. यादव सर यांनी केले तर आभार क्रीडा विभाग प्रमुख श्री ए.बी. पाटील यांनी केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा