साप्ताहिक शुभकार्य=16/8/2024

कोरोची ग्रामपंचायत कर्मचारी काम बंद आंदोलनाचे सरपंच संतोष भोरे यांना निवेदन देताना सर्व कर्मचारी 

कोरोची ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन  सुरुवात

कोरोची वार्ताहर: (उत्तम हुजरे)-

 कोरोची ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे   विविध मागणीसाठी काम   बंद आंदोलन  सुरू करण्यात आले आहे  या आंदोलणास ग्रामपंचायतीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे.

कोरोची ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन आज  शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट पासून करण्यात आले आहे अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामपंचायतीशी संबंधित सरपंच , ग्रामसेवक , ग्रामपंचायत कर्मचारी , ग्रामरोजगार सेवक , संगणक परिचालक यांनी बेमुदत काम बंद आंदोलन केलेले आहे . ग्रामपंचायत घटकांच्या प्रमुख मागण्या अश्या करण्यात आल्या आहेत की नियमित व सन्मानजनक मानधन , भत्ता मिळावे  सरपंचांना १५ हजार , उपसरपंचांना १० हजार , तर सदस्याला तीन हजार मानधन मिळावे  ग्रामपंचायत संबंधित सर्व घटकांना विमा , पेन्शन , निश्चित वेतन लागू करावे  मुंबईत सरपंच भवनाची स्थापना करावी  ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी पद एकत्रित करून पंचायत विकास अधिकारी म्हणावे  ग्रामरोजगार सेवकाची नेमणूक पूर्णवेळ करून वेतननिश्चिती करावी  संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यााच्या आकृतिबंधात आणावे  यावलकर समितीचा अहवाल त्वरित लागू करावा  संगणक परिचालकांचा भार ग्रामपंचातीऐवजी शासनाने उचलावा. ग्रामपंचायतींना स्वायत्त संस्थेचा अधिकार देऊन विकासकामे करण्याचा अधिकार द्यावा अश्या प्रकारच्या मागण्या करण्यात आलाय आहेत. या सर्व मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनास सरपंच डॉ. संतोष भोरे यांनी  पत्र देऊन सरपंच उपसरपंच व सर्व सदस्यांच्या वतीने आपणास पाठिंबा   आहे असे आपल्या मनोगतात व्यक्त केले.

यावेळी दीपक माने राजकुमार मिरजकर, अमर कारवेकर रेखा जाधव, सुनिता चौगुले, चंद्रकांत कारले, अक्षय गलांडे, आकाश तोरवे ,विक्रम कोष्टी त्रिवेणी माने ,राजवर्धन ठाणेकर, सागर पवार, संदीप बिरंबोळे  राहुल कोरवी, सनी आवळे, भारती आवळे, सखुबाई आवळे, कल्पना माने, व इतर सर्व ग्रामपंचायत  कर्मचारी तसेच सर्व पाणीपुरवठा कर्मचारी यांचा जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट