साप्ताहिक शुभकार्य -9/8/2024
दे.भ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या समाधीस्थळावरती पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलेरत्नदीप हायस्कूलच्या वतीने नऊ ऑगस्ट क्रांती दिन हुतात्म्यांना अभिवादन
कबनूर -(उत्तम हुजरे)- येथील रत्नदीप हायस्कूल ज्युनिअर कॉलेज व कुमार विद्यामंदिर गंगानगर कबनूर यांच्या वतीने 9 ऑगस्ट क्रांती दिन व हुतात्मा दिनाच्या निमित्ताने सकाळी हायस्कूल मध्ये फोटो पूजन करत हुतात्म्यांना अभिवादन केले
त्यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी नऊ ऑगस्ट क्रांती दिना वरती आपले मनोगते व्यक्त केली
तसेच या क्रांती दिनाच्या निमित्ताने देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या समाधीस्थळावरती जाऊन मुख्याध्यापक एस पी दीक्षित सर यांच्या हस्ते त्यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले
यावेळी रत्नदीप हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे तसेच कुमार विद्यामंदिर चे सर्व शिक्षक, शिक्षिका ,विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा