साप्ताहिक शुभकार्य=24/8/2824
रांगोळीतून अवतरले महाकाल शंकर अघोरी
रांगोळी कलाकार भाग्यश्री कोपार्डे यांचे सर्व स्तरातून कौतुक
उत्तम हुजरे -साप्ताहीक शुभकार्य
इचलकरंजी येथील श्री आर्ट क्लासेसचे संस्थापक भाग्यश्री कोपार्डे यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून आठ बाय पाच फुटाची महाकाल शंकर अघोरी रूपातील रांगोळी काढत सर्वांची मने जिंकले ही रांगोळी काढण्यासाठी त्यांना एकूण 19 तासांचा अवधी लागला
भाग्यश्री कोपार्डे या सध्या केटकाळे नगर इचलकरंजी येथे राहत असून ते श्री आर्ट या नावाने क्लासेस चालवतात त्यांचा काही दिवसापूर्वी अपघात झाल्याने दोन्ही पायाने ते अधू असून सुद्धा त्या सध्या चाळीस विद्यार्थ्यांना रांगोळी मेहंदी, तसेच अक्षरलेखन असे क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडवतात
ही रांगोळी काढण्यासाठी त्यांना किशोरी एगरे तसेच सोनाली चौधरी यांची मोलाची साथ लाभली

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा