साप्ताहिक शुभकार्य=13/8/2024


       श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव निमित्त कोरोचीत कार्यक्रम 

   कोरोची -(उत्तम हुजरे)- साप्ताहिक शुभकार्य 

येथील श्री जिव्हेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री जिव्हेश्वर स्वकुळ साळी समाज कोरोची यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शनिवार दिनांक 16 रोजी सकाळी नऊ ते दहा या वेळेत जिव्हेश्वर हॉलमध्ये श्री जिव्हेश्वर पारायण चे आयोजन,

 तसेच शनिवार दिनांक 17 रोजी पहाटे 5 ते 6 या वेळेत श्रीकांत सरदार हुपरे यांचे पोथी वाचन, पहाटे 6 वाजून 22 मिनिटांनी श्री भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सव, सकाळी 7 ते 8 वाजता ओम नमः शिवाय जप, सकाळी 8 ते 9 वाजता महिलांचा हळदी  कुंकवांचा  कार्यक्रम तसेच दुपारी 12 वाजता महाप्रसाद संपन्न होणार असल्याने श्री जिव्हेश्वर स्वकुळ साळी समाज कोरोची यांच्यातर्फे होणाऱ्या जन्मोत्सव कार्यक्रमास सर्व साळी समाज बांधवांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे

   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट