साप्ताहिक शुभकार्य=24/8/2024
मुख्याध्यापक भोकरे यांना जाब विचारताना ग्रामपंचायत सदस्य साहेब लाल शेखकोरोची येथील जि.प शाळेमधील मुख्याध्यापक भोकरे यांचे गैर वर्तणूक
शाळेमध्ये असणाऱ्या मदतनीस यांना नाहक त्रास
कोरोची--- येथील जि प शाळा कन्या विद्यामंदिर मधील मुख्याध्यापक श्री यशवंत भोकरे सर यांनी शाळेमध्ये असलेल्या मदतनीस यांना परिस्थितीचा गैरफायदा घेत वारंवार नाहक त्रास देत गैर वर्तणूक केल्याची संदर्भात तक्रार ग्रामपंचायत सदस्य साहेब लाल शेख यांनी आज दिली
याबाबत अधिक माहिती अशी की कोरोची जी प शाळेमध्ये मुख्याध्यापक यशवंत भोकरे यांची काही महिन्यापूर्वी मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती झाली आहे ते पदभार स्वीकारल्यापासून शाळेमध्ये असणाऱ्या मदतनीस यांना परिस्थितीचा गैरफायदा घेत वारंवार कामाच्या बाबतीत नाहक त्रास होत असल्याची तक्रार मदतनीस यांनी ग्रामपंचायत सदस्य साहेबलाल शेख व ग्रामपंचायत सदस्य संगीता शेट्टी यांना वारंवार दिली होती
याची दखल घेत आज ग्रामपंचायत सदस्य साहेब लाल शेख यांनी मुख्याध्यापक भोकरे यांना जाब विचारत चांगलेच धारेवर धरले व याविषयी हातकलंगले गट शिक्षण अधिकाऱ्यांना तक्रार करणार देणार असल्याचे सांगितले जोपर्यंत मुख्याध्यापक भोकरे यांची निलंबंन होत नाही तोपर्यंत शाळेसमोर उपोषण करण्याचा इशारा साहेबलाल शेख यांनी दिला
याबाबत मदतनीस यांना विचारणा केली असता शाळेतील साफसफाई व इतर कामकाजा व्यतिरिक्त काम न सांगता मुख्याध्यापक भोकरे वारंवार नोकरीवरून काढून देण्याची धमकी देत माझ्या समोरच तुम्ही ऑफिस कार्यालयात बसायचं लज्जा उत्पन्न होईल अशा गलिच्छ शब्दात मुख्याध्यापक भोकरे यांनी मदतणीस यांना वारंवार त्रास दिला
अशा मुख्याध्यापकांवर ती योग्य ती कारवाई करून त्यांचे निलंबन करावे अशी मागणी विद्यार्थी पालक वर्गातून होत आहे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा