साप्ताहिक शुभकार्य=30/8/2024



कोरोचीत संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी

उत्तम हुजरे -साप्ताहीक शुभकार्य 

   कोरोची येथील संत सेना नाभिक समाज मंडळ कोरोची यांच्या वतीने संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला हा सोहळा कोरोची येथील विठ्ठल मंदिरात पार पडला दुपारी बारा वाजता आरती होऊन फुले वाहण्याचा कार्यक्रम पार पडला 

    प्रारंभी प्रतिमेचे पूजन अध्यक्ष तानाजी मर्दाने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या सोहळ्याला बालाजी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मदन कारंडे तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी उपस्थितीत राहून संतसेना महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन केले या सर्वांच्या हस्ते महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी अध्यक्ष तानाजी मर्दाने ,उपाध्यक्ष निलेश साळुंखे, सेक्रेटरी महेश चौधरी ,खजिनदार योगेश जाधव, यांच्यासह ग्राम पंचायत सदस्य शीतल पाटील ,साहेब लाल शेख, संजय कांबळे, विकी माने ,आनंदा शेट्टी, डी बी पीष्टे, रणजित शिंदे, बंडा पाटील, प्रकाश पवळे, नरसु पाटील,अभिनंदन पाटील, यांच्यासह कोरोची नगरीतील सर्व नाभिक समाज  बांधव महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट