साप्ताहिक शुभकार्य -2/8/2024

लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करताना रत्नदीप हायस्कूलचे मुख्याध्यापक एस पी दीक्षित सर तसेच सर्व शिक्षक विद्यार्थी 

रत्नदीप हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, गंगानगर येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी. 

      उत्तम हुजरे- गंगानगर- कबनूर येथील रत्नदीप हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक एस.पी.दीक्षित होते. 

       मान्यवरांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कु. गौरी मुसंडी हिने केले तर नेहा म्हेतर,वैष्णवी वास्कर, अवनिता कांबळे तसेच ज्येष्ठ शिक्षक ए.व्ही. यादव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

         कार्यक्रमास शिक्षक, शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती आंबी हिने केले तर आभार त्रिवेणी अस्वले हिने मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट