साप्ताहिक शुभकार्य=13/8/2024


बेडकिहाळ  ची शान उषाराणी हत्तीचा मृत्यू 

उत्तम हुजरे -(साप्ताहिक शुभकार्य)

   बेडकिहाळ ची शान उषाराणी हत्तीचा ५१ व्या वर्षी शनिवारी ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. उषाराणी हतीं वर बेडकिहाळ व परिसरातील नागरिकांचे खुप प्रेम होते. उषाराणीचा मृत्यू झाल्यामुळे बेडकिहाळ व  परिसरातुन  हळहळ व्यक्त होत

आहे.आचार्य रत्न श्री १०८

देशभूषण महाराज यांच्या कुप्पनवाडी शांतीगिरी  आश्रमातील बेडकिहाळ गावात १९७१ मध्ये सर्केबैल ( शिमोगा येथून वयाच्या ६ व्या वर्षी एक हत्ती आणण्यात 'आला होता. बेडकिहाळ

गावचे संदिप पाटील यांच्या शेतात हत्ती राहत होता. ऐतिहासिक दसरा उत्सव, दिवाळी आणि पालखी सोहळ्यासह जैन समाजाच्या पंचकल्याण महोत्सव कार्यक्रमात सहभाग असायचा. उषाराणीची ओळख धार्मिक कार्यक्रमातच नाही तर चित्रपट आणि मालिकांमध्येही होती. स्वामी समर्थ चित्रपट, जानता राजा महानाट्य, राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या मालिकेने आपली छाप पाडली होती. श्री स्वामीजी आणि माहूत बसु लक्ष्मेश्वर यांनी उषाराणी हत्तीला अखेरची श्रध्दांजली वाहिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट