साप्ताहिक शुभकार्य=5/8/2024
घरफाळा व पाणीपट्टी भरून ग्रामपंचायतीस सहकार्य करावे अन्यथा उद्यापासून जप्तीची मोहीम सुरू
ग्राम विकास अधिकारी अनंत गडदे
कोरोची- येथील कोरोची ग्रामपंचायत यांच्या वतीने आवाहन करण्यात येते की कोरोची नगरीतील नागरिकांनी थकित घर फाळा व पाणीपट्टी भरून ग्रामपंचायत सहकार्य करावे अन्यथा जप्तीची मोहीम राबवण्यात येणार असून थकबाकीदारांना या कारवाईला सामोरे जावे लागेल असे आवाहन कोरोची ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी अनंत गडदे यांनी आज ग्रामपंचायत च्या वतीने केले
कोरोची गावची लोकसंख्या 55 ते 56 हजाराच्या वरती असून गावचा विकास तसेच पाणी योजना चालवण्यासाठी
घरफाळा दीड कोटी रुपये थकीत असल्याने आणि पाणी बिल 80 लाख रुपये येणे असल्याने सदरची योजना चालवण्यासाठी आणि गावचा विकास साधण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे
पाणी योजना चालवण्यासाठी टि सी एल तुरटी, तसेच कर्मचारी पगार व लाईट बिल यासाठी महिना 10 लाख रुपये लागतात तर ही योजना चांगल्या पद्धतीने चालली जाईल सध्या गावात पाच हजाराच्या वरती नळ कनेक्शन असल्याने यासाठी महिना साडेसात लाख रुपये महिना लाईट बिल लागते
तसेच गावात गटारी कचरा, दिवाबत्ती, व इतर विकास कामासाठी ग्रामपंचायत माध्यमातून होणाऱ्या कामांना गती मिळावी म्हणून कोरोची नगरीतील नागरिकांनी घरफाळा व पाणीपट्टी भरून ग्रामपंचायत लवकरात लवकर सहकार्य करावे
तसेच ज्या कारखानदारांना उद्योजकांना थकीत घरफाळा व पाणीपट्टी बिलापोटी नोटीस लागू करण्यात आली आहेत त्या सर्वांनी तात्काळ आपले घर पाळा व पाणीपट्टी भरून ग्रामपंचायतला सहकार करावे अन्यथा होणाऱ्या कारवाईला सामोरे जावेल असे आव्हान कोरोची ग्रामपंचायत ग्राम विकास अधिकारी अनंत गडदे यांनी केले आहे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा