साप्ताहिक शुभकार्य=26/8/2024

मुख्याध्यापक भोकरे यांना मारहाण करताना नागरिक 


यशवंत भोकरे मुख्याध्यापक यांना  नागरिकांनी दिला चोप

उत्तम हुजरे -साप्ताहीक शुभकार्य 

    कोरोची येथील  गावभाग कन्या विद्यामंदिर येथील मुख्याध्यापक यशवंत भोकरे यांना नागरिकांनी चांगला चोप देत कार्यालयातून बाहेर काढले 

    याबाबत अधिक माहिती अशी की दोन दिवसांपूर्वी मुख्याध्यापक भोकरे यांच्या विरोधात शाळेतील मदतनीस यांनी ग्रामपंचायत सदस्य साहेबलाल शेख यांच्याकडे तक्रार दिली होती त्याची दखल घेत ग्रामपंचायत सदस्य साहेब लाल शेख यांनी मुख्याध्यापक भोकरे यांना चांगलेच धारेवर धरले होते याची तक्रार गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे देण्यासाठी आज कन्या विद्यामंदिर या ठिकाणी ग्रामपंचायत मधील सरपंच व सर्व सदस्य हजर असता मुख्याध्यापक भोकरे यांना सरपंच व सर्व सदस्यांनी केलेल्या वर्तुनुकी बद्दल चांगले धारेवर धरले

  तेथे हा सर्व प्रकार घडत असताना त्या ठिकाणी आलेल्या नागरिकांनी मुख्याध्यापक भोकरे यांना केलेल्या वर्तणुकीबद्दल त्यांच्या अंगावर जाऊन चांगलाच चोप दिला 

व त्यांना शाळेतून बाहेर काढले सदर प्रकार घडत असताना मारहाण केलेले मुख्याध्यापक भोकरे यांनी शाळेतून पलायन केले 

   याविषयी सरपंच भोरे यांनी ग्रामपंचायत मध्ये सर्व सदस्यांच्या यांची तात्काळ बैठक घेऊन भोकरे  यांनी निलंबन करण्याची मागणीचा ठराव करत गटशिक्षण अधिकारी यांना बोलावून निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट