साप्ताहिक शुभकार्य=31/8/2024

30 व्या वार्षिक सभेत बोलताना संस्थापक चेअरमन शरदचंद्र पाठक 


श्री महालक्ष्मी क्रेडिट सौहार्द सहकारी संघ लि कुन्नूर 30 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

 सभासदांनी विश्वासहर्ता जपली-- शरदचंद्र पाठक

कुन्नूर-उत्तम हुजरे-साप्ताहीक शुभकार्य 

 श्री महालक्ष्मी क्रेडिट सौहार्द सहकारी संघा ने सभासदांचा विश्वास संपादन करत  सभासदांच्या पाठीशी संस्था ठामपणे उभे राहिले आहे असे प्रतिपादन संस्थापक चेअरमन श्री शरदचंद्र पाठक यांनी 30 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष स्थानावरून बोलत होते 

   प्रारंभी चेअरमन व सर्व संचालक यांच्या हस्ते हस्ते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करून वार्षिक सभेची सुरुवात करण्यात आली 

    यावेळी संस्थापक चेअरमन श्री शरदचंद्र पाठक  म्हणाले संस्थेने गोरगरिबांच्या पाठीशी ठामपणे राहत अनेकांच्या गरजा पूर्ण करत संस्थेने वाटचाल सुरू ठेवली आहे संस्थेचे वाटचाल  पाहता महाराष्ट्र राज्यातील क्रांती रत्न सोशल फाउंडेशनने या संस्थेला उत्कृष्ट पतसंस्था संस्था म्हणून पुरस्काराने सन्मानित केले

    याचे सर्व श्रेय सभासदांना जाते सभासदांच्या विश्वासहर्ता मुळेच आज संस्था चांगल्या प्रकारे कामकाज करत आहे  संस्थेच्या दोन शाखा बारवाड व बेनाडी शाखेने प्रगती करत संस्थेला मोलाचे सहकार्य केले आहे संस्थेला अहवाल सालात  ऑडिट *अ* मिळाला आहे 

  आज संस्थेकडे 456 सभासद असून ठेवी 34 कोटी तर गुंतवणूक 6.48.92.598 असुन निव्वळ नफा 46 लाख 05 हजार 198 इतका झाला आहे  सभासदांना 15 टक्के लाभांश देऊन सभासदांच्या विश्वासास पात्र राहून संस्थेने आर्थिक उलाढाल चांगले केले आहे  तसेच संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत बेनाडी , कुन्नुर,गजबरवाडी,आडी,मांगूर मधील 10 वी व 12 वी मध्ये गुण मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला 

यासाठी संस्थेचे सर्व संचालक मंडळ, सभासद, ठेवीदार, यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे 

  यावेळी संस्थेचे सर्व संचालक मंडळ सभासद  ठेवीदार कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक केदार पाठक यांनी केले तर अहवाल वाचन सेक्रटरी बाळासो पाटील यांनी केले तर शेवटी आभार बि.एस मगदूम यांनी मानले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट