साप्ताहिक शुभकार्य=13/8/2024
कोरोची सरपंच संतोष भोरे अखेर ठरले पात्र
पुणे आयुक्तांनी दिला निकाल
कोरोची-( उत्तम हुजरे)-साप्ताहीक शुभकार्य
कोरोची येथील 2022-27 सालातील पंचवार्षिक निवडणुकीसाठी लोकनियुक्त सरपंच पदासाठी संतोष भोरे यांच्यासह सहा जणांनी अर्ज दाखल केला होता सदरच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार संतोष भोरे लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आले
निवडून आल्यानंतर सरपंच भोरे यांनी सरपंच पदासाठी राहिलेल्या पराजित उमेदवारांना कॅव्हेट दाखल केले होते त्या कॅव्हेट च्या विरोधात जाऊन पराजित उमेदवारांनी संतोष भोरे यांच्या वरती अतिक्रमण बाबत सरपंच पद अपात्र ठरवण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज क्रमांक 3/2023 दाखल केला होता त्यास जिल्हाधिकारी यांनी आदेश देत जानेवारी 2024 मध्ये संतोष भोरे यांचे सरपंच पद अपात्र ठरवले होते
त्या दिलेल्या निर्णयाच्या विरोधात जाऊन संतोष भोरे यांनी अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे अपील दाखल केले असता पुणे आयुक्तांनी 18 जुलै 2024 पर्यंत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला स्थगिती दिली होती
18 जुलै २०२४ रोजी सदर अपिला वरती दोन्ही बाजूंच्या वकिलांचे युक्तिवाद म्हणने ऐकून अंतिम निर्णय देण्यास बाकी होता
8 ऑगस्ट 2024 रोजी पुणे आयुक्त यांनी जिल्हाधिकारी यांचा आदेश रद्द ठरवेत सरपंच भोरे पात्र असल्याचा निकाल त्यांच्या वेबसाईट वरती अपलोड करून जाहीर करण्यात आला
सदर पात्र सरपंच डॉक्टर संतोष भोरे यांच्याकडून एडवोकेट समीर मुदगल यांनी काम पाहिले
त्यांच्या या निकालामुळे कोरोची गावकऱ्यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून सरपंच भोरे यांच्या वरती अभिनंदन चा वर्षाव होत आहे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा