साप्ताहिक शुभकार्य=9/8/2024
कोरोची ग्रामपंचायत ठिकाणी बीडीओ मोकाशी मॅडम व रामन्ना साहेब तसेच पोवार साहेब यांचा सत्कार करताना ग्रामविकास अधिकारी अनंत गडदे
.
बी डी.ओ मोकाशी मॅडम यांनी केले कोरोची ग्रामपंचायतीचे कौतुक
कोरोची- (उत्तम हुजरे)-
कोरोची ग्रामपंचायत या ठिकाणी बी.डी.ओ मोकाशी मॅडम आणि विस्तार अधिकारी रामन्ना साहेब व पोवार साहेब यांनी अचानकच भेट दिली असता ग्राम विकास अधिकारी अनंत गडदे यांनी त्यांचे स्वागत केले
सदरच्या भेटी अंतर्गत ग्रामपंचायत मधील दप्तर तपासणी करून तसेच विकास कामाचा आढावा, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन बाबत माहिती , अपूर्ण घरकुल, व अनुजाती व नवबौद्ध वस्तीतील मंजूर कामे याबाबत नियोजन व निधी खर्च करणे तसेच हर घर तिरंगा अभियान यशस्वी करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले
त्यावेळी मोकाशी मॅडम यांनी कोरोची ग्रामपंचायतीने घरफाळा वसुली करत एक आदर्श दिला असून सरपंच संतोष भोरे व ग्रामविकास अधिकारी अंनत गडदे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी कौतुक यांचे केले अशीच कामकाजाची सातत्य ठेवून कोरोची गाव आदर्श बनवावे यासाठी शुभेच्छा दिल्या
यावेळी ग्रामपंचायत ग्राम विकास अधिकाऱ्यांच्या सह ग्रामपंचायत मधील सर्व कर्मचारी उपस्थित होते


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा