साप्ताहिक शुभकार्य=10/8/2024
इचलकरंजी मध्ये सुताची 200 बॉक्स चोरणाऱ्याला शहापूर पोलिसांनी घेतले ताब्यात: 43 लाख 71 हजाराचा मुद्देमाल हस्तगत
कोरोची (उत्तम हुजरे)------
इचलकरंजी मध्ये आयशर गाडी सह 61 कोंबड कॉम्पॅक्ट चे 200 बॉक्स चोरून येणाऱ्या अभिजीत महावीर खोत वय वर्ष 32 राहणार गणेश नगर शहापूर याला शहापूर पोलिसांनी 200 सुताचे बॉक्स व आईशर गाडी असा एकूण 43 ला 71 हजार 414 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे तर याबाबतची फिर्याद आकाश महावीर खोत राहणार गणेश नगर शहापूर यांनी शहापूर पोलिसात दिली आहे तर पोलिसातुन मिळालेली अधिक माहिती अशी की आकाश खोत यांनी आयशर एम एच 11 एल 26 09 व KA 23 A 4975 या गाडी शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी सुताचे बॉक्स भरून अरिहंत पार्किंग येथे लावली होती तर चार ऑगस्ट ते पाच ऑगस्ट च्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने या ठिकाणाहून टेम्पो चोरून नेल्याची फिर्याद आकाश खोत यांनी शहापूर पोलिसात दिली होती तपास करताना गोपनीय तपासाच्या आधारे माहिती काढली असता फिर्यादी आकाश खोत याचा भाऊ अभिजीत खोत याला पोलिसांनी ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता त्याने सदर गुन्हा केला असल्याची कबूल दिली व दोनशे बॉक्स व वाहन असा 43 लाख 71हजार 414 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे तर सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी पोलीस सब इन्स्पेक्टर दरेकर ,अविनाश मुंगसे, प्रमोद भांगरे, आसिफ कलाईगार ,अर्जुन फातले ,रोहित डावाळे, आदींच्या पथकाने केली अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी करत आहेत

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा