साप्ताहिक शुभकार्य=30/8/2024
मलिकवाड सरस्वती को ऑप क्रेडिट व वीर राणी चन्नम्मा महिला दूध संस्थेचे वार्षिक सभा उत्साहात संपन्न
सभासदांनी विश्वासहर्ता जपली-- सौ शोभा पाटील
मलिकवाड--- उत्तम हुजरे -साप्ताहीक शुभकार्य
येथील सरस्वती को ऑफ क्रेडिट सोसायटी ने सभासदांचा विश्वास संपादन करत तसेच वीर राणी चन्नम्मा दूध उत्पादक सहकारी संघाने दूध उत्पादकांचा विश्वास संपादन करत विश्वासहर्ता जपले असून सभासदांच्या पाठीशी संस्था ठामपणे उभे राहिले आहे असे प्रतिपादन मलिकवाड सरस्वती सोसायटीचे संस्थेचे चेअरपर्सन सौ शोभा पाटील यांनी संस्थेच्या 26 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व वीर राणी चन्नम्मा दूध उत्पादक संस्थेच्या 25 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष स्थानावरून बोलत होते
प्रारंभी विविध मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले ग्रामपंचायत उपाध्यक्ष संभाजी पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून वार्षिक सभेची सुरुवात करण्यात आली
यावेळी संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पाटील बोलताना म्हणाले संस्थेने गोरगरिबांच्या पाठीशी ठामपणे राहत अनेकांच्या गरजा पूर्ण करत संस्थेने वाटचाल सुरू ठेवली आहे संस्थेचे वाटचाल पाहता महाराष्ट्र राज्यातील क्रांती रत्न सोशल फाउंडेशनने या संस्थेला उत्कृष्ट महिला संस्था म्हणून पुरस्काराने सन्मानित केले याचे सर्व श्रेय सभासदांना जाते सभासदांच्या विश्वासहर्ता मुळेच आज संस्था चांगल्या प्रकारे कामकाज करत आहे
आज संस्थेकडे 809 सभासद असून ठेवी 35,74,88,982 तर गुंतवणूक 5,50,25,756 असुन निव्वळ नफा 40 लाख 38 हजार 152 इतका झाला असून संस्थेने ऑडिट अ वर्ग प्राप्त केला आहे तसेच सभासदांना 12 टक्के लाभांश देऊन सभासदांच्या विश्वासास पात्र राहून संस्थेने आर्थिक उलाढाल चांगले केले आहे तसेच वीर राणी चन्नम्मा दूध उत्पादक संघाने दूध उत्पादकाच्या पाठीशी राहत अनेक योजना सभासदांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केली आहे सध्या सभासद 597 असून दूध संकलन चार लाख 17 हजार लिटर इतका असून नफा पाच लाख सहा हजार इतका झाला आहे या दुधसंस्थेने चढता आलेख ठेवत दूध उत्पादकांच्या पाठीशी ठामपणे संस्था राहिली असून यासाठी दोन्ही संस्थेचे सर्व संचालक मंडळ, सभासद, ठेवीदार, यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे
यावेळी सरस्वती महिला को-ऑप क्रेडिट सोसायटीचे व्हाईस चेअर पर्सन सुलोचना कट्टीकर , वीर राणी चन्नम्मा दूध उत्पादक संघाच्या चेअरपर्सन यशोदीता पाटील ,व्हाईसचेअर पर्सन गीता कोळी, सेक्रेटरी पल्लवी पाटील, मलिकवाड ग्रामपंचायत उपाध्यक्ष संभाजी पाटील, अशोक पाटील, राजू मुल्ला, निर्मला कांबळे, यांच्यासह दोन्ही संस्थेचे सर्व संचालक मंडळ सभासद ठेवीदार कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत वीर राणी चन्नम्मा दूध उत्पादक सहकारी संघाच्या चेअर पर्सन यशोदीता पाटील यांनी तर प्रास्ताविक भारती कांबळे व संस्थेचे मुख्य व्यवस्थापक राजेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले शेवटी आभार हसीना अपराज यांनी मानले


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा