साप्ताहिक शुभकार्य=7/8/2024


कोरोची जिल्हा परिषद शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा चे उद्घाटन

  कोरोची -कोरोची येथील ग्रामपंचायत  फंडातून जिल्हा परिषद शाळा असलेली कुमार विद्यामंदिर व कन्या विद्या मंदिर कोरोची तसेच लोकमान्य नगर भागशाळा या शाळेला कोरोची ग्रामपंचायत फंडातून सीसीटीव्ही कॅमेरे देण्यात आले

  या सीसीटीव्ही कॅमेरा चा उद्घाटन सोहळा कोरोची सरपंच डॉ संतोष भोरे यांच्या हस्ते करण्यात आले

  यावेळी सरपंच भोरे बोलताना म्हणाले कोरोची नगरीतील जिल्हा परिषद शाळेचा शिक्षणाचा दर्जा वाढावा तसेच शिक्षण संस्थेवर ती अंकुश राहावा व शिक्षण संस्था चांगल्या प्रकारे चालावी  यासाठी ग्रामपंचायत फंडातून आज कोरोची नगरीतील दोन जिल्हा परिषद शाळांना सीसीटीव्ही देण्यात आले 

   इथून पुढे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लागिल ती शाळेला मदत  करण्याचे आश्वासन ही यावेळी सरपंच भोरे यांनी दिले

  यावेळी उपसरपंच पुजा टेळे, ग्रामपंचायत सदस्य विकी माने,संजय शहापुरे ,स्नेहल कोरोचीकर, संगिता मगदूम, अश्विनी चव्हाण, अमर कोरोचीकर, असलम सनदी यांच्या सह कुमार विद्यामंदिर व कन्या विद्या मंदिर तसेच लोकमान्य नगर भाग शाळा यांचे सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका  विद्यार्थी विद्यार्थ्यांनी उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट