साप्ताहिक शुभकार्य=9/8/2024


कोरोचीत हुतात्म्यांना अभिवादन

कोरोची वार्ताहर :कोरोची येथे ग्रामपंचायत यांच्यावतीनेे  9 ऑगस्ट क्रांती दिना निमित्त व हुतात्मदिनानिमित्त जिल्हा परिषद कुमार विद्यामंदिर येथे स्थापित करण्यात आलेल्या हुतात्मा शिलालेखास अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

सरपंच डॉ. संतोष  भोरे यांच्या हस्ते हुतात्मा शिलालेखाचे पूजन करण्यात आले व ग्राम विकास अधिकारी आनंद गडदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मानवंदना व शपथ घेण्यात आली.यावेळेस डॉ . संतोष भोरे व ग्रामविकास अधिकारी अंनत गडदे यांनी शहीद झालेल्या हुतात्म्यांना अभिवादन करून 13 ऑगस्ट 2024 ते 15 ऑगस्ट 2024 पर्यंत सर्वांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकून या तीन दिवसात विविध कार्यक्रमाचे आयोजन करावे असे आवाहन केले.

यावेळी पोलीस पाटील सावकर हेगडे, तंटामुक्त अध्यक्ष, नितीन चौगुले, ग्रामपंचायत सदस्य साहेबलाल शेख, मुख्याध्यापक बाबासाहेब डोळे, दीपक माने, राजकुमार मिरजकर, रशीद  ढालाईत, यांच्यासह ग्रामस्थ शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट