साप्ताहिक शुभकार्य=24/8/2824
शिक्षक पालक सहविचार सभेवेळी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक एस पी. दीक्षित सररत्नदीप हायस्कूल मध्ये शिक्षक- पालक सहविचार सभा संपन्न
उत्तम हुजरे ----साप्ताहीक शुभकार्य
कबनूर -येथील रत्नदीप हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षक-पालक सहविचार सभा संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक एस.पी.दीक्षित होते.
बोर्ड परीक्षेचे नियोजन, विद्यार्थ्यांचे आरोग्य व शालेय योजना या विषयावर चर्चासत्र घडून यावे म्हणून या सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री आनंद यादव सर यांनी केले तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती, आरोग्य व अभ्यास नियोजन या विषयी आपले विचार मांडले. श्री डी. के.चौगुले सर यांनी दहावी नंतरचे करिअर या विषयावर मार्गदर्शन केले. पी.सी.कोरे मॅडम यांनी शालेय परीक्षा व वार्षिक नियोजन याची पालकांना माहिती दिली .
यावेळी पालक सुहास परीट यांनी आपल्या मनोगतामध्ये येणाऱ्या दहावी बोर्डासाठी कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम करावा तसेच नियोजन करून येणाऱ्या परीक्षेमध्ये गुणवत्ता कशी वाढवता येईल याची परिपूर्ण तयारी विद्यार्थ्यांनी व पालकांनी करून घ्यावी असे मार्गदर्शन केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुष्पा कोरे मॅडम यांनी केले या वेळी सर्व पालक महिला शिक्षक शिक्षिका विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार यादव सर यांनी मानले

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा