साप्ताहिक शुभकार्य=29/8/2024
कोरोची गाव घनकचरामुक्त होणार
मा.जि .प .सदस्य राहुल आवाडे
कोरोची- कोरोची ग्रामपंचायत कोरोची यांच्या वतीने कोरोची गावातील राहुल आवाडे यांच्या पुढाकाराने तसेच आमदार प्रकाश आवाडे यांच्या फंडातून कोरोची गावात अनेक विकास कामे पूर्ण झाल्याबद्दल
कोरोची ग्रामपंचायतच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांचा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला या सत्कार सोहळा प्रसंगी जिल्हा परिषदेचे राहुल आवारडे यांनी कोरोची गाव घनकचरा मुक्त करण्याचे आश्वासन दिले
याबाबत अधिक माहिती अशी की कोरोची गावात गेली दहा वर्ष घनकचरा गावभर पसरला असून यामुळे कोरोचीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे कचऱ्या बाबत अनेक वेळा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घनकचरा मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले पण काही ग्रामस्थांच्या आडमुट्या धोरणामुळे घनकचरा प्रश्न प्रलंबित पडला आहे
याविषयी कोरोची सरपंच डॉ. संतोष भोरे यांनी विशेष ग्रामपंचायत कार्यालय येथे सर्व सदस्यांची विशेष मीटिंग बोलावून या मिटींगला युवा नेते राहुल आवाडे यांना बोलावून कोरोची गावांमध्ये सर्व विकास कामे केल्यामुळे सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी गावातील तीन जिल्हा परिषद शाळेतील शौचालय पुनर्वसन संबंधित निवेदन देण्यात आले
यावेळी सरपंच भोरे बोलताना म्हणाले आमदार प्रकाश आवाडे यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाचा निधी खर्च करून गावचा सर्वांगीण विकास चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे गावातील एकही विकास कामे वंचित राहिले नाही त्याचबरोबर अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला घनकचरा प्रश्न मार्गी लावावा व गाव घनकचरा मुक्त करावे असे निवेदन व विनवणी यावेळी भोरे यांनी राहुल आवाडे यांना केली
यावेळी राहुल आवाडे बोलताना म्हणाले कोरोची ग्रामपंचायत यांच्यावतीने जो सत्कार सोहळा आयोजित केला त्याबद्दल मी ग्रामपंचायतीचे आभार मानतो
तसेच कोरोची गावची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून या गावाकडे आमदार प्रकाश आवाडे अण्णा यांनी विशेष लक्ष देऊन कोट्यावधी रुपयाची कामे पूर्णत्वास घेऊन गेले आहेत तसेच काही उरलेले विकास कामे थोड्याच दिवसात पूर्ण होईल यांची मी ग्वाही देतो तसेच कोरोची गावचा प्रलंबित असलेला घनकचऱ्याचा प्रश्न मार्गी लावून कोरोची गाव घनकचरा मुक्त करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून यासाठी ग्रामपंचायत यांच्या वतीने कोरोची गावाला एकूण सहा वार्ड असल्याने किमान दोन वार्डाचा घनकचरा एका ठिकाणी साठवून तो कचरा माझ्या स्वतःच्या जबाबदारीवर घेऊन जाऊन त्याची विल्हेवाट लावून देऊन कोरोची गाव कचरामुक्त करून देण्याचे आश्वासन दिले
यावेळी विनायक बचाटे, ग्रामसेवक अनंत गडदे, उपसरपंच पूजा टेळे ग्रामपंचायत सदस्य साहेब लाल शेख, विकी माने, राजकुमार चावरे ,सतीश सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्या हालिमा सनदी, स्नेहल कोरोची कर, संगीता शेट्टी, आरती कुंभार, आनंदी आमते , संजय कांबळे ,शितल पाटील, यांच्यासह ग्राम पंचायत कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा