साप्ताहिक शुभकार्य=18/8/2024


सहारा फाउंडेशनने गुणवंत विद्यार्थ्यांना दिली कौतुकाची थाप

उत्तम हुजरे -साप्ताहीक शुभकार्य 

 सामाजिक जाण व भान ठेवून सहारा फौंडेशन उपक्रम राबविते त्यामुळे त्यांचे कार्य आदर्शवत आहे."असे प्रतिपादन देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. एम.पाटील यांनी केले.

    सहारा फाउंडेशनच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणा सन्मान ने सन्मानित केले त्या समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.प्रमुख पाहुणे म्हणून व्यंकटेश सहकारी सूतगिरणीचे संचालक अशोकराव पाटील,पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रमोद पाटील उपस्थित होते.

    सहारा फाउंडेशनचे अध्यक्ष महेश कांबळे यांनी स्वागत तसेच प्रास्ताविक सहारा फौंडेशन चे संस्थापक पापालाल सनदी यांनी केले यावेळी सहारा फाउंडेशन च्यावतीने राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.सरपंच शोभा पोवार,पंचायत समितीच्या माजी सभापती रेश्मा पापालाल सनदी,उपसरपंच सुधीर लिगाडे, मराठा समाजाचे अध्यक्ष प्रा.रवींद्र पाटील,प्रा. अप्पासाहेब वाघमारे,महावीर पिंपळे,अनिल हजारे यांनी मनोगत व्यक्त केले.दहावी,बारावी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या तसेच कुस्ती,ॲथलेटिक्समध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रेरणा सन्मान शिल्ड देऊन गौरवण्यात आले.

  यावेळी ग्रामपंचायत सदस्य वैशाली कदम, जवाहर सहकारी बँकेचे संचालक बबनराव केटकाळे,पतसंस्था फेडरेशनचे तालुका उपाध्यक्ष अनिल परीट,परवेझ सनदी,सचिन आंबी,महेश कांबळे-मांडवकर,उमेश जाधव,सचिन सुतार,मुनीर जमादार,जैद भोकरे,युनूस मकानदार ,सचिन कांबळे,महेश पाटील,बबन उर्फ राजेंद्र केटकाळे शिवपुत्र हिरेमठ आदी उपस्थित होते.प्रा. आप्पासाहेब वाघमारे,देवदत्त कुंभार यांनी सूत्रसंचालन केले.सचिन सुतार यांनी आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट