साप्ताहिक शुभकार्य=7/8/2024

कोरोचीतील न्यू मिलीनियम इंग्लिश स्कूल शिक्षण संस्थेला खाजगी कंपनीने केले सील

 2 कोटी 79लाख 79हजार 665 रुपये थकीत*

कोरोची- कोरोची येथील खाजगी शिक्षण संस्था श्रीनिवास एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू मिलेनियम इंग्लिश स्कूल या शिक्षण संस्थेला पुणे येथील खाजगी कंपनीने करून मालमत्ता ताब्यात घेतली आहे या घटनेने पालक व विद्यार्थी वर्गात मोठी खळबळ माजली आहे

  याबाबत अधिक माहिती अशी की कोरोची भागातील  विजया मोहन यांची खाजगी शिक्षण संस्था  असलेली न्यू मिलेनियम इंग्लिश स्कूलला पुण्यातील प्रोफेक्ट कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड पुणे या खाजगी फायनान्स कंपनीने दिनांक 11 मे 2023 रोजी स्कूल ला डिमांड नोटीस दिली होती त्या नोटीसमध्ये शिक्षण संस्थेसाठी दिलेली 2  कोटी 79 लाख 79 हजार 665 रुपये नमूद केलेली रक्कम ही नोटीस मिळाल्यापासून साठ दिवसाच्या आत परतफेड करण्याचे आवाहन केले होते सदरची कर्ज रक्कम परतफेड करण्यात अयशस्वी झाल्यामुळे 6 ऑगस्ट रोजी कंपनीने नोटीस लागु करत सील करून सदरची शिक्षण संस्था व सर्व मालमत्ता ताब्यात घेऊन व्यवहार न करण्याची खबरदारी दिली

 यामुळे विद्यार्थी वर्गात व पालक वर्गात खळबळ माजली असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असून पालकांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट