साप्ताहिक शुभकार्य=17/8/2024
संग्रहित छायाचित्ररुई गावात पुर्व वैमनस्यातून दोन समाजात तुंबळ हाणामारी एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी
कोरोची -उत्तम हुजरे -साप्ताहीक शुभकार्य
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील रुई गावांमध्ये पूर्व वैमनस्याच्या वादातून दोन समाजा मध्ये तुंबळ हाणामारी झाली या हाणामारी मध्ये सचिन बाबासाहेब कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली
या बाबत अधिक माहिती अशी की रूई गावातील एका स्पर्धेच्या निमित्ताने गेल्या वर्षभरापासून या दोन समाजात वाद धुमसत होता त्यामुळे गेल्या वर्षभरापासून सुरू असलेला वाद मीटवण्यासाठी गेले असता पुन्हा त्या ठिकाणी वादाची ठिणगी पडली यातून शाब्दिक चकमक होत त्यांचे रूपांतर तुंबळ हाणामारी मध्ये झाले असता त्यात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा