साप्ताहिक शुभकार्य=5-8-2024
गावच्या विकासासाठी घरफाळा व पाणीपट्टी भरून सहकार्य करावे सरपंच-संतोष भोरे
कोरोची -येथील गावचा विकास साधण्यासाठी कचरा उठाव, दिवाबत्ती , तसेच पाणी योजना व्यवस्थित चालवण्यासाठी घरफाळा व पाणीपट्टी भरून नागरिकांनी सहकार्य करावे
कोरोची नगरीची वाढती लोकसंख्या पाहता लाईट बिल, कर्मचारी पगार, तसेच पाणी योजना चालवण्यासाठी लागणारे सामग्री तसेच विकासकामा साठी लागणारा निधी ग्रामपंचायती कडे अपुरा पडत असल्यामुळे विकास कामांची पूर्तता होत नसल्याने ग्रामपंचायतीस अडचण येत आहे तरी कोरोची नगरीतील सर्व नागरिकांनी,उद्योजकांनी ,कारखानदारांनी आपला घरफाळा व पाणीपट्टी भरून ग्रामपंचायतीस लवकरात लवकर सहकार करावे अन्यथा होणाऱ्या कारवाईमध्ये ग्रामपंचायत मधील कोणताही लोकप्रतिनिधी हस्तक्षेप करणार नसल्याने होणाऱ्या कारवाईला सामोरे जावे लागेल कारवाईला सामोरे न जाता ग्रामपंचायतीस सहकार्य करावे असे मत कोरोची सरपंच डॉ. संतोष भोरे यांनी व्यक्त केले

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा