साप्ताहिक शुभकार्य=6-8-2024
कोरोचीत घरफाळा व पाणीपट्टीची जप्तीची धडक मोहीम सुरू
कोरोची येथील ग्रामपंचायत च्या वतीने घरफाळा व पाणीपट्टी वसुली विरोधात कारखानदार तसेच उद्योजक व ग्रामस्थांच्या घरी जाऊन घरफाळा व पाणीपट्टी वसुली चालू केली असून कारखानदारांचे व थकितदारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत
काही थकीत कारखानदार ग्रामपंचायत मध्ये येऊन थकीत घरफाळा व पाणीपट्टी भरण्यास सुरुवात केली आहे
कोरोची ग्रामपंचायतीच्या च्या वतीने सुरू असलेल्या जप्ती मोहीम मध्ये ग्रामविकास अधिकारी अनंत गडदे व त्यांच्या जप्ती वसुली पथकाने थकीत कारखानदार व ग्रामस्थ यांच्या घरी जाऊन त्यांना 24 तासांचा अवधी देत थकीत घरफाळा व पाणीपट्टी भरून सहकार्य करावे अन्यथा उद्या बुधवार दिनांक 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजल्यानंतर जे कोणी थकीत घरफाळा व पाणीपट्टी भरली नाही त्यांना पोलीस बंदोबस्तात त्यांचा व्यवसाय व कारखाना सील करून जोपर्यंत थकित घरफाळा व पाणीपट्टी भरत नाहीत तोपर्यंत कारखान्याला टाळे ठोकून सील केले जाईल तरी सर्व थकितदारांनी लवकरात लवकर आपला थकीत घरफाळा व पाणीपट्टी भरून ग्रामपंचायत सहकार्य करावे असे आवाहन ग्रामविकास अधिकारी अनंत गडदे यांनी केले सदर मोहिमेवेळी जप्ती अधिकारी दीपक माने, राजकुमार मिरजकर, अमर कारवेकर, राहुल कोरवेकर, त्रिवेणी माने, रेखा जाधव ,चंद्रकांत कारले, आकाश थोरवे, शाहरुख सय्यद, यांच्यासह ग्राम पंचायत मधील कर्मचारी वर्ग उपस्थित होते
कोरोची येथील स्वतःला राजकीय,सामाजिक कार्यकर्ता समजला जाणाऱ्या धनाजी नामक व्यक्तीने ग्रामपंचायत मधील आपले एक शासकीय काम करून घेण्यासाठी ग्रामपंचायत घरफाळा व पाणीपट्टी पोटी 20,000 रुपयाचा ग्रामपंचायतीचे नावे दिलेला चेकचा फोटो मोबाईल द्वारे पाठवत आपले शासकीय काम करून घेतले व दाखला मिळवून घेतला तो चेक ग्रामपंचायतीला देणार असल्याचे भासवून ग्रामपंचायतीला फसवले व सदरचा चेकही दिला नाही व ग्रामपंचायतीची फसवणूक केली असल्याची चर्चा ग्रामपंचायतीच्या वर्तुळातून सुरू होती

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा