साप्ताहिक शुभकार्य -26-7-2024
वृद्धाश्रमात फळे वाटप करताना जी पी पारसिक बँकेचे अधिकारी
जी पी पारसिक बँकेच्या वतीने गुरुपौर्णिमा निमित्त वृद्धाश्रमात फळे वाटप
कोरोची (वार्ताहर)- इचलकरंजी येथील जी पी पारसिक बँकेच्या वतीने गुरुपौर्णिमा निमित्त चोकाक फाटा इचलकरंजी कोल्हापूर येथील शांती कुंज वृद्धाश्रमात वृद्धांना फळे वाटप करून जी पी पारसिक सहकारी बँकेने सामाजिक बांधिलकी जपली अशी सामाजिक बांधिलकी जपणारी एकमेव बँक असून या बँकेचा आदर्श इतर बँकेने घ्यावा असे मत वृद्धाश्रमाचे मॅनेजर विजयकुमार सातपुते यांनी बोलताना व्यक्त केले
बँकेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय गोपीनाथ दादा शिवराम पाटील यांच्या प्रेरणेतून व श्री दीनानाथ पांडुरंग म्हात्रे यांच्या पुढाकारातून हा सदरचा उपक्रम राबवण्यात आला
यावेळी इचलकरंजी शाखेचे अधिकारी श्री अनवेश बांदे ऑफिसर विलास यादव कर्मचारी महेश उगलमुगले तसेच वृद्धाश्रमाचे मॅनेजर विजयकुमार सातपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा