साप्ताहिक शुभकार्य -14-7-2024
तेजस फाउंडेशन चा पुरस्कार सोहळा 

माणकाकापूर येथील पत्रकार शिवाजी येडवाण समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

                           उत्तम हुजरे- इचलकरंजी तेजस फाऊंडेशन नाशिक आयोजित, कालकथित तेजस मेघा डोळस यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा डॉ. मौलाना आझाद संशोधन केंद्र, टि.व्ही सेंटर हडको, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी इचलकरंजी येथील जेष्ठ धन्वंतरी- डॉ. अर्जून घट्टे व अभिनेता- लालचंद पारिक, जादुगार- रमेश बरडे (यड्राव), पत्रकार- शिवाजी येडवान (माणकापूर), कवी- साताप्पा सुतार (यळगुड), विजयकुमार साबळे (तुरुंबे), प्रवचनकार- विलास पाटील (हुपरी), सिध्दाप्पा गावडे (कारदगा), सौ. वैशाली कांबळे (फलटण), बाॅलीवुड अभिनेते- विजय मानवतकर (छ. संभाजी नगर- औरंगाबाद) व अभिनेते- शैलेंद्र होळकर (मध्यप्रदेश) यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सदर सन्मानदिन्ह व सन्मानपत्र देऊन राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी मा. नितीन देशमुख  (व्हा.चेअरमन- देवगिरी साखर कारखाना, फुलंब्री); संस्थेच्या अध्यक्षा व अभिनेत्री- मेघा डोळस; आशिष सातपुते (अभिनेता, मुंबई); सुप्रसिद्ध गायिका- कडुबाई खरात (छ.संभाजी नगर); मानसी राणे   (अभिनेत्री, मुंबई); चित्रपट लेखक- महेंद्र तुपे आदी प्रमुख मान्यवरांसह विविध क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट