साप्ताहिक शुभकार्य -23-7-2024

रत्नदीप हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज स्मृती सन्मान सोहळा निमित्त मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या अध्यक्षा सौ रजनीताई मगदूम 

रत्नदीप हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने स्मृती सन्मान व पाद्यपूजन सोहळा संपन्न

   कोरोची -कबनूर येथील रत्नदीप हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, गंगानगर च्या वतीने गुरुपौर्णिमा निमित्त सेवानिवृत्त शिक्षकांचा स्मृती सन्मान व पाद्यपूजन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी 50 सेवानिवृत्त शिक्षकांची उपस्थिती होती हे विशेष...

    यावेळी शिक्षण संस्था स्थापन झाल्यापासून आज तागायत शिक्षण संस्थेमधून सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक ,शिक्षक -शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांचा गुरुपौर्णिमा निमित्त स्मृती सन्मान सोहळा व पाद्यपूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

    प्रारंभी मान्यवर व सर्व सेवानिवृत्त शिक्षकांच्या हस्ते दे.भ.रत्नाप्पाण्णा कुंभार व रत्नपन्नांचे राजकीय मार्गदर्शक कै. दादासाहेब मगदूम(मास्तर) यांच्या  प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

   त्यानंतर या सर्व सेवानिवृत्त शिक्षकांचा शाल ,स्मृतीचिन्ह व गुलाबाचे फुल देऊन  संस्थेच्या अध्यक्षा रजनीताई मगदूम , उपस्थित संस्थाचालक  तसेच रत्नदीप हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.एस. पी. दीक्षित सर यांच्या हस्ते सत्कार घेण्यात आले.

   यावेळी कॉलेजचे विभाग प्रमुख प्रा. डी. एस. माळी सर, माजी शिक्षक श्री. नांदणे सर, श्री सांगले सर , श्री. पी. एम. पाटील सर, श्री.गिरीश शहा सर, श्री. एस. एम. मगदूम सर, सौ. कोळी मॅडम, कोल्हापुरे मॅडम,स्कूल कमिटी चेअरमन अशोक पाटील  यांनी मनोगते व्यक्त केली. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये संस्थेबद्दल तसेच सेवानिवृत्त झालेल्या सर्व शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी यांनी दिलेल्या  योगदान बद्दल आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी अनेक जुन्या स्मृतींना उजाळा दिला गेला. एका वेळेला एवढ्या मोठ्या संख्येने सेवानिवृत्त झालेले शिक्षक एकत्र आल्यामुळे सर्वच जुन्या आणि नवीन शिक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता याची प्रचिती आली.

        यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ. रजनीताई विश्वनाथ मगदूम यांनी आपल्या मनोगतात सेवानिवृत्त शिक्षकांनी संस्थेला दिलेल्या योगदानाबद्दल व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना  दिलेल्या ज्ञानदानाच्या पवित्र सेवेबद्दल गौरव उद्गार काढले. सर्व  शिक्षक व कर्मचाऱ्यांचे  कौतुक करून त्यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभाव अशा सदिच्छा दिल्या.

  यावेळी कुमार विद्यामंदिरचे स्कूल कमिटी चेअरमन श्री. अशोक पाटील, संस्थेचे संचालक श्री.पी.एम.पाटील सर ,सर्व माजी मुख्याध्यापक, सर्व  शिक्षक- शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी वर्ग तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 स्वागत व प्रास्ताविक विद्यमान  मुख्याध्यापक श्री.एस. पी.दीक्षित सर यांनी केले.  आभार कुमार विद्यामंदिर चे मुख्याध्यापक व जिल्हा परिषद सदस्य श्री विजय भोजे सर यांनी मांडले. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आनंद यादव सर यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट