साप्ताहिक शुभकार्य -22-7-2024
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ आध्यत्मिक विकास व सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित) शाखा कोरोची यांच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
कोरोची - येथील स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास सेवा केंद्र कोरोची यांच्या वतीने गुरुपौर्णिमा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले
सकाळ पासून भाविकांनी दर्शना साठी गर्दी केली होती. सकाळी भूपाळी आरतीनंतर श्री स्वामी समर्थ महारांज्यांच्या मूर्ती वर अभिषेक घालून सर्व सेवेकरी व भाविकांना गुरुपद देण्याचा कार्यक्रम सुरु झाला. त्यानंतर साडेदहा वाजता नैवेद्य आरती माजी नगरसेवक श्री. मनोज हिंगमिरे हस्ते संप्पन्न झाली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत साडेचारशे च्या वर भाविकांनी श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरु करून घेतले. मोठया भक्तीभावात गुरुपौर्णिमेचा सोहळा संप्पन्न झाला. सोहळ्यासाठी कोरोची गावातील व परिसरातील भाविक व सेवेकरी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा