साप्ताहिक शुभकार्य -22-7-2024

जी.पी. पारसिक बँकेच्या वतीने गुरुपौर्णिमा निमित्त वृक्षारोपण संपन्न

कोरोची : येथील  जी.पी. पारसिक सहकारी बँक यांच्यावतीने गुरुपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.

गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून जी. पी. पारसिक सहकारी बँक  लि.यांच्या क्लस्टर 4 च्या वतीने कर्मचारी वर्गाने गुरुवर्य बँकेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय गोपीनाथदादा शिवराम पाटील यांना गुरुवंदना म्हणून क्लस्टर हेड  दीनानाथ पांडुरंग म्हात्रे  यांच्या पुढाकाराने कोरोची -शाहू पुतळा- इचलकरंजी येथे बँकेच्या परिसरात  45 कर्मचाऱ्यांच्या वतीने प्रत्येकी एक फुलाचे झाड लावून आपल्या लोकप्रिय गुरूंना आपली गुरु भेट दिली.या निमित्ताने संपूर्ण इचलकरंजी परिसरामध्ये जी. पी. पारसिक बँकेचे व सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे

यावेळी एडवोकेट चिरमुंगे,मे स्वरा डिजिटल चे अमर शिवते,शाखाधिकारी अन्वेष बांदे,श्रीकांत पाटील, अरुण पाटील, विकास भोसले,बाहुबली पाटील, उज्वला मधाळे,रोशन पाटील, चिराग मोकाशी, अमित घाडगे ,संतोष हेरुगिरी, प्रकाश गावडे ,शिवाजी मोरे, रामचंद्र कोरवी, यांच्यासहबँक स्टाफ व कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट