साप्ताहिक शुभकार्य -31-7-2024
कोरोचीत सर्पमित्र चेतन चावरे याची आत्महत्या
कोरोची वार्ताहर: कोरोची चावरे मळा येथील धाडसी सर्पमित्र चेतन बाबासो चावरे (वय वर्ष 32) याने घरामध्ये तुळीला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. चेतन चावरे यांनी नाग-घोणस- धामीन- फरुड जातीच्या अनेक सापांना जीवदान दिले आहे. गावामध्ये कोणाच्या ही घरी साप आल्यास तो साप पकडून तो साप कोणत्या जातीचा आहे याची माहिती देऊन त्या सापाला जीवदान देण्याचे कार्य करीत होते. मंगळवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.हातकलंगले ग्रामीण रुग्णालय येथे शव विच्छेदन करून प्रेत अंत्यविधीसाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. आत्महत्याचे कारण नेमके समजू शकले नाही याची नोंद शहापूर पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे.त्याच्या पश्चात आई-वडील असा परिवार आहे त्याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा