साप्ताहिक शुभकार्य -29-7-2024
इचलकरंजी मध्ये अपघातात एकाचा मृत्यू व एकजण जखमी
इचलकरंजी येथील होळकर चौक ते खंजिरे पेट्रोल पंप कडे जाणारा रोडवर असलेले योगेश्री सायकल दुकान च्या समोर रविवार दिनांक 28 जुलै रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास झालेल्या अपघातात राजू वसंत आईवळे वय वर्ष 45 राहणार शिरढोन तालुका शिरोळ यांचा मृत्यू झाला तर तोसिफ हनिफ सय्यद वय वर्ष 29 राहणार कृष्णनगर शहापूर हे जखमी झाले आहेत तर पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की राजू वसंत आयवळे व तोसीफ सय्यद हे सेन्ट्रीन काम करतात तर हे दोघे एम एच झिरो नाईन बीडी 23 97 वरून हेरले येथे कामासाठी जात असताना होळकर चौक ते खंजिरे पेट्रोल पंप जवळ जाणार रोडवर असलेल्या योगेश्री सायकल दुकान च्या समोरुन येणाऱ्या छोटा हत्ती टेम्पो नंबर एम एच 45 73 61 वरील चालकाने त्यांच्या टेम्पोमध्ये मोठा बीम भरून घेऊन जात होता तो बीम टेम्पोच्या बाहेर जादा प्रमाणात आल्या असल्याने व तो टेम्पो भरदाव वेगाने चालवून अचानक पणे बाजूला टेम्पो घेतल्याने सदर टेम्पो मधील बीमाची बाहेरील आलेली बाजू तोसिफ व त्यांचा कामगार राजू आईवळे यांना जोरात लागल्याने यामध्ये तोसिप सय्यद हे जखमी झाले असून त्यांचा कामगार राजू आईवळे यांचा मृत्यू झाला तर याबाबद ची फिर्याद तोसिफ सय्यद यांनी शहापूर पोलीस ठाण्यात दिले आहे अधिक तपास शहापूर पोलीस करत आहे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा