साप्ताहिक शुभकार्य -12-7-2024सामाजिक कार्यकर्ते महेश कांबळे यांचा वाढदिवस साजरा करताना उपस्थित मान्यवर व विद्यार्थी
कबनूर येथील सामाजिक कार्यकर्ते महेश कांबळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
कबनूर -येथील सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करत असलेले कोणत्याही प्रकारची कोणाकडूनही अपेक्षा न बाळगणारे महेश कांबळे यांचा वाढदिवस कुमार , कन्या विद्या मंदिर व उर्दू शाळा व अंगणवाडी कबनूर येथे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करून साजरा करण्यात आला ,वाढदिवसाच्या अनावश्यक खर्च टाळून महेश कांबळे यांनी समाज उपयोगी उपक्रम राबवत वाढदिवस साजरा केला ,महेश कांबळे हे राजकारण न करता नेहमीच समाजकारणामध्ये सक्रिय असल्याचे दिसून येते सामाजिक उपक्रमामध्ये ते नेहमीच अग्रेसर असतात, महेश कांबळे यांचा मंडप लाईट डेकोरेशनचे काम आहे तर ते गोरगरिबांना लग्नसराईत असू दे किंवा कार्यक्रम ते पण पैसे न घेता मदत म्हणून मंडप घालून देतात, त्यांची कायमच सामाजिक भान ठेवून आपण समाजाला काहीतरी देणे लागतो हे मनोभावना मनात ठेवून खऱ्या अर्थाने महेश कांबळे यांचे कार्य चालू आहे ,आज वाढदिवसानिमित्त कबनूर येथील कन्या व कुमार विद्यामंदिर तसेच उर्दू शाळा येथे शैक्षणिक साहित्य वाटपावेळी महेश कांबळे बोलताना म्हणाले ह्याच कबनूरच्या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण घेतले परंतु घरची परिस्थितीमुळे शिकता आले नाही व दप्तर वर्गात असायचे आणि आम्ही कामावर असायचो अशा परिस्थितीमध्ये आम्हाला शिक्षण पूर्ण करता आले नाही पण तुम्ही शिका असा मुलांना कानमंत्र दिला तर यावेळी शालेय साहित्य विद्यार्थ्यांना वाटप केल्यानंतर चिमुकल्यांचा आनंद गगनाला मावेनाअसा दिसून येत होता ,तर यावेळी स्वागत डावरे सर प्रास्तविक दत्ता शिंदे यांनी केले, सागर परीट, समीर जमादार, बबन केटकळे, बाळासो माने पापालाल सनदी, सचिन सुतार,उत्तम जाधव, उपसरपंच सुधीर लिगाडे,यांची भाषणे झाली, आभार युवराज कांबळे यांनी मानले,

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा