साप्ताहिक शुभकार्य 27-7-2024

दत्त साखर कारखाना चेअरमन पदी रघुनाथ पाटील तर व्हाईस चेअरमन पदी शरदचंद्र पाठक यांची  निवड

   शिरोळ- येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी रघुनाथ देवगोंडा पाटील यांची तर व्हाईस चेअरमन पदी शरदचंद्र विश्वनाथ पाठक यांची एक मताने निवड करण्यात आली

  श्रीदत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच संपन्न झाली कारखान्याचे चेअरमन सहकार महर्षी गणपतराव पाटील यांचे नेतृत्वाखाली श्री दत्त शेतकरी विकास पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले

  श्री दत्त साखर कारखान्यात चेअरमन व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात कारखान्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षखाली नूतन संचालक मंडळाची विशेष सभा पार पडली यावेळी कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी चेअरमन पदासाठी रघुनाथ पाटील यांचे नाव सुचवले त्याच ज्येष्ठ संचालक अनिल कुमार यादव यांनी अनुमोदन दिले चेअरमन पदासाठी रघुनाथ पाटील यांची एकमेव नाव पुढे आल्याने त्यांची एकमताने निवड झाली तर व्हाईस चेअरमन पदासाठी कारखान्याचे व्हाईस चेअरमन अरुण कुमार देसाई यांनी शरदचंद्र पाठक यांचे नाव सुचवले त्याच ज्येष्ठ संचालक इंद्रजीत पाटील यांनी अनुमोदन दिले त्यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे  यांनी नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या त्यावेळी सहकार महर्षी गणपत दादा पाटील, कारखान्याचे कार्यकारी संचालक, सर्व नूतन संचालक आदी मान्यवर उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट