साप्ताहिक शुभकार्य=6/9/2024




कोरोची घनकचरा उठाव मोहिमेस प्रारंभ
 

राहुल आवाडे यांच्या  प्रयत्नांना यश

उत्तम हुजरे -साप्ताहीक शुभकार्य 

 कोरोची -कोरोची येथील अनेक वर्ष प्रलंबित असलेला घनकचऱ्याचा प्रश्न मार्गी लागला असून त्या घनकचऱ्याचा उठाव आजपासून करण्यात आला 

   याबाबत अधिक माहिती अशी की कोरोची गावचा घनकचऱ्याचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित होता डॉ. राहुल आवाडे यांनी या प्रश्नाला जाणीवपूर्वक लक्ष घालून कोरोची गाव घनकचरा मुक्त करण्याची ठरवले त्यानुसार ग्रामपंचायतीच्या वतीने एकूण सहा वॉर्डातील कचरा एका ठिकाणी साठवत तो जमा झालेला कचरा आपल्या जबाबदारी वरती आठवड्यातून तीन वेळा उठवत कोरोची गाव घनकचरा मुक्त करण्याची जबाबदारी उचलली त्यानुसार आज पासून जमा झालेला कचरा उठावास प्रारंभ झाला असून नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे तसेच कोरोची गाव घनकचरा मुक्त गाव म्हणून लवकरच नावारूपास येईल अशी चर्चा नागरिकांतून सुरू होती. या कचरा उठावा वेळी सरपंच संतोष भोरे ग्रामसेवक अनंत गडदे, ग्रामपंचायत सदस्य साहेबलाल शेख, संजय कांबळे ,शीतल पाटील, विकी माने, बंडा पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट