इचलकरंजीत ड्रग्जचा साठा जप्त! तरुणाला बेड्या; बंदी असलेली इंजेक्शने व मोबाईलसह ₹३० हजारांचा मुद्देमाल जप्त इचलकरंजी, प्रतिनिधी : उत्तम हुजरे शिवाजीनगर पोलिसांनी कबनूर परिसरात कारवाई करत एका २३ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मेफेंटरमाइन सल्फेट (Termin) या इंजेक्शनच्या ५१ सीलबंद बाटल्या तसेच एक मोबाईल असा एकूण ₹३०,५०४ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास कबनूर येथील यशवंत कॉलनी ते पाटील मळा जाणाऱ्या रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी निखील शंकर पाटील (वय २३, रा. सातगोंडा पाटील मळा, कबनूर) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, १२५ व २७८ अंतर्गत गुन्हा क्रमांक ५५७/२०२६ नोंद करण्यात आला आहे. या कारवाईत प्रत्येकी १० मि.ली.च्या ५१ सीलबंद मेफेंटरमाइन सल्फेट (Termin) इंजेक्शनच्या बाटल्या (किंमत ₹१५,५०४) तसेच Vivo V51 कंपनीचा मोबाईल (किंमत ₹१५,०००) असा एकूण ₹३०,५०४ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्य...
पोस्ट्स
जुलै, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे